GoodNews : अजिंक्य रहाणे आणि राधिकाच्या कुटुंबात येणार नवीन सदस्य

GoodNews : अजिंक्य रहाणे आणि राधिकाच्या कुटुंबात येणार नवीन सदस्य

भारतीय टेस्ट टीमचा उपकप्तान आणि मुंबईकर असलेला अजिंक्य रहाणे लवकरच बाबा होणार आहे. नुकतेच त्याने आपल्या बायको म्हणजेच राधिकाच्या डोहाळेजेवणाचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आणि आपला आनंद व्यक्त केला.

कुणीतरी येणार येणार गं...

क्रिकेटमधील क्युट कपल्समध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिकाचाही समावेश होतो. तसंच अजिंक्य आणि राधिका हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे अजिंक्यने हे फोटो क्युट फोटो शेअर करताच ते व्हायरल झाले. पाहा हे फोटोज -

View this post on Instagram

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

या फोटोमध्ये राधिका डोहाळेजेवणाच्या वेळी खास घालण्यात येणाऱ्या फुलांच्या दागिन्यात दिसत आहे. ती या दागिन्यांमध्ये आणि बाळंतपणाच्या ग्लोमध्ये फारच छान दिसतेय. डोहाळेजेवणाला घालण्यात येणाऱ्या हिरव्या साडीच्या प्रथेप्रमाणे तिनेही याच रंगाला पसंती दिली आहे. तर अजिंक्यनेही त्याला साजेसा कुर्ता घातला आहे. या फोटोज दिसणारा या दोघांचा आनंद अवर्णनीय आहे.

Instagram

आम्ही आमच्या कुटुंबात अजून थोडं जास्त प्रेम अॅड करत आहोत अशी प्रतिक्रिया राधिकाने तिच्या पोस्टमध्ये दिली आहे तर अजिंक्यने हार्ट्सचा इमोजी टाकून ही पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य आणि राधिकाची लव्हस्टोरी

अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची लव्हस्टोरी ही त्यांच्या जोडीसारखीच क्युट आहे. या दोघांचं लव्हमॅरेज असून ते एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र होते. गमतीची गोष्टी म्हणजे ते दोघंही शेजारीच राहत असत. अजिंक्यचा स्वभाव शांत तर राधिका तेवढीच बोलकी होती. नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यच्या स्ट्रगलच्या काळापासून राधिका त्याच्यासोबत आहे. या दोघांचंही लग्न 26 नोव्हेंबर 2014 मध्ये झालं. मराठमोळ्या पद्धतीने हे लग्न पार पडलं होतं. 

View this post on Instagram

💖

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

आता या नव्या पाहुण्याच्या आगमनाने दोघांच्या आयुष्यातील आनंद नक्कीच द्विगुणित होणार आहे. #Congratulation #AjinkyaRahane #RadhikaDhopavkar.

हेही वाचा -

जय आणि माहीच्या घरी येणार नवा पाहुणा

Good News: सलमानच्या घरी येणार नवा पाहुणा, ‘खान’दान आनंदी

#Viralvideo : समीरा रेड्डीने सांगितला प्रेग्नन्सीचा ‘खरा’ पैलू