'कहोना प्यार है' फेम क्युट ते हॉट अमिषा पटेलचा नवा 'हॉट' व्हिडिओ

'कहोना प्यार है' फेम क्युट ते हॉट अमिषा पटेलचा नवा 'हॉट' व्हिडिओ

‘दिल मेरा हरबार ये सुनने को तैयार है.. कहोना प्यार है’ असे समुद्र किनाऱ्यावर गाणारी गोड अमिषा पटेल.. एका रात्रीत स्टार झाली. पण म्हणतात ना की, एका चित्रपटातून मिळालेले यश टिकून ठेवणेही कठीण असते. अमिषाच्या बाबतीत अगदी तसेच झाले असे म्हणायला हवे. त्या एका चित्रपटानंतर ती फार चित्रपटातून दिसली नाही. शिवाय तिने ज्या चित्रपटात काम केले. त्यांनी तिला नवी ओळख मिळवून दिली नाही. पण सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती एका व्हिडिओमुळे.. हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुमच्या तोंडीही हॉटी अमिषा अशी कमेंट आल्यावाचून राहणार नाही.


कुंकू, टिकली आणि टॅटू फेम अभिनेत्री करणार प्रेमात कल्ला
 

 

 


View this post on Instagram


 

 

Love my life 💖thanku god


A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on
अमिषाचे सेमी न्यूड फोटोशूट


अमिषाने हा व्हिडिओ स्वत: तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यात ती तिच्या सेमीन्यूड अवतारात दिसत आहे. आता हा व्हिडिओ तिच्या फोटोशूटदरम्यानचा आहे. हा व्हिडिओ तिने पोस्ट केल्यानंतर अवघ्या काहीच तासात या व्हिडिओला लाखांच्या घरात लोकांनी पाहिले. आता ती नेमकं कशासाठी इतकं हॉट शूट करत आहे. या संदर्भात तिने काहीच सांगितले नाही. पण तिने ही पोस्ट शेअर करत ‘love my life thank u god’ अशी कॅप्शन लिहिली आहे. त्यामुळे आता हे शूट कशासाठी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थोडं थांबाव लागणार आहे.


नाही मिळाले चांगले चित्रपट


 २०१३ मध्ये अमिषा ‘रेस’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिला कोणतेही चांगले चित्रपट मिळाले नाही. त्यामुळे ती फोटोशूट करण्यात व्यग्र असते.हे तिने पोस्ट केलेल्या तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन कळते. या शिवाय ती फॅशन शोमध्येही अनेकदा दिसली आहे.


ameesha patel hot


तैमुरच्या नॅनीचा पगार ऐकाल तर तुम्हीही कदाचित करीअर बदलण्याचा विचार कराल


अमिषावर फसवणुकीचा आरोप


अमिषा मध्यंतरीच्या काळात तिच्या कॉन्ट्राव्हर्सिजनीदेखील अधिक प्रकाशझोतात आली. गेल्यावर्षी म्हणजेच १६ नोव्हेंबर २०१७ला तिला दिल्लीतील मुरादाबाद येथील एका लग्नसोहळ्यासाठी नृत्य सादर करण्यासाठी बोलावले होते.  त्यासाठी तिला ११ लाख रुपये देण्यात आले होते. पण ती त्या दिवशी त्या कार्यक्रमात पोहोचलीच नाही. तिच्या अशा वागण्यामुळे तिला तो कार्यक्रम रद्द करावा लागला. अमिषा दिल्ली दिल्लीला पोहोचली. तिच्या मॅनेजरला या संदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्ही दिल्लीला पोहोचलो आहोत. मुरादाबादला पोहोचण्यासाठी आम्हाला ५ तास लागतील असे सांगितले. मुळात दिल्ली मुरादाबाद हे अंतर केवळ दीड तासाचे आहे. असे सांगून तिच्या मॅनेजरने आणखी दोन लाखाची मागणी केली. आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.


ameesha patel-2


राशीनुसार तुम्ही निवडा तुमचे करीअर आणि करा तुमचे भविष्य उज्वल


काहीच दिवसांपूर्वी अमिषा- ऋतिक आले होते एकत्र


आता तुम्हाला  माहीतच असेल अमिषा आणि ऋतिकने एकाच चित्रपटातून डेब्यु केले होते. त्यानंतर त्यांनी ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटातून काम केले. पण त्यानंतर त्यांनी कधीच चित्रपटात काम केले नाही. त्यांचा पहिला चित्रपट जितका सुपर डुपर हिट झाला. तितकाच त्यांचा दुसरा चित्रपट दणदणीत आपटला. त्यामुळे प्रेक्षकांना या नव्या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छाच मावळून गेली. पण काही दिवसांपूर्वी एका विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी हे दोघे आले होते. खूप वर्षांनी त्यांना एकत्र पाहून त्यांच्या फॅन्सना आनंद तर झालाच. पण त्या दोघांनीही खूप दिवसांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Always lovely seeing u my darling @hrithikroshan 💖💖💖💖


A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on
 (सौजन्य-Instagram)