‘दबंग 3’ च्या गाण्याचं चित्रीकरण व्हायरल, चुलबुल पांडेला भेटले चाहते

‘दबंग 3’ च्या गाण्याचं चित्रीकरण व्हायरल, चुलबुल पांडेला भेटले चाहते

दबंग या चित्रपटाची सिरीज म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी. पहिले दोन्ही दबंग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. आता ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून हा चित्रपटदेखील चर्चेत आहे. सलमानचा जन्म झाला त्या शहरात अर्थात इंदूरमध्ये सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. नदी किनाऱ्यावर लहान मुलांबरोबर मस्ती करताना व्हायरल झालेले सलमान फोटोचे आणि व्हिडिओ हे सध्या इंटरनेटवर धमाल करत आहेत. वास्तविक सलमानने नुकतंच भारत या चित्रपटाचं चित्रीकरण संपवून दबंगच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. मध्यप्रदेशमधील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर चालू असणाऱ्या या चित्रीकरणादरम्यान चुलबुल पांडेच्या अंदाजात सलमान खानने आपल्या चाहत्यांना भेट दिली.


‘दबंग 3’ च्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल


दबंगच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणापासून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सलमान खान या ठिकाणी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. तर सलमान खानच्या अधिकृत अकाऊंटवरूनही व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. जो सध्या इंटरनेटवर खूपच पाहिला जात आहे. सलमान खानला चित्रीकरणादरम्यान बघण्यासाठी खूप गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सलमानच्या गाण्याचं शूट चालू आहे आणि तो व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडिओ -  सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ अपलोड केला असून यामध्ये सलमान आपल्या चाहत्यांबरोबर संवाद साधत असताना दिसत आहे. याचबरोबर ‘दबंग चुलबुल पांडे’ चा फोटोही यामध्ये दिसून येत आहे. या फोटोमध्ये नदी किनारी काही मुलं खेळत आहेत आणि त्यामध्ये सलमानही दिसत आहे. पण चेहरा दिसत नसला तरीही शरीरयष्टी सलमानची असल्याचं लक्षात येत आहे. कारण हा फोटो सूर्यास्ताच्या वेळी काढण्यात आला आहे. यामध्ये मुलांबरोबर सलमानची सावली दिसत आहे. तर हा फोटो करून सलमानने लिहिलं आहे, ‘नमस्ते, सलाम आलेकुम, हॅलो आणि सर्व चाहते आणि मध्यप्रदेशच्या महेश्वर पोलिसांचे मनापासून आभार’. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत असून याआधी सलमान आणि प्रभुदेवा यांनी ‘वॉन्टेड’ हा हिट चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती अरबाज खान आणि निखिल द्विवेदी करत आहेत.


‘दबंग 3’ ची उत्सुकता


salman as chulbul FI


पहिल्या दोन्ही सिरीजमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटातही सोनाक्षीच काम करणार आहे. शिवाय दबंग म्हटलं की, विलन आणि हिरो हे दोन्हीही तगडेच हवेत. यावेळी देखील या सिरीजमध्ये तगडा विलन सुदीपच्या रूपात लाभला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘दबंग 3’ ची उत्सुकता आहे. सलमान आणि सुदीप आमनेसामने काय कमाल दाखवणार हा आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण यापूर्वी सुदीपने आपली अभिनय क्षमता ‘मख्खी’ या चित्रपटातून दाखवून दिली आहे.


सलमानने नुकतंच संपवलं ‘भारत’चं चित्रीकरण


salman and katrina FI


सलमान खान गेले काही महिने अली अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होता. यावर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होत असून पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी नेहमीच या जोडीला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटामध्ये दिशा पटानीचीदेखील महत्त्वाची भूमिका असून तिने यासाठी खास प्रशिक्षण घेतलं असल्याचंही समोर आलं आहे. शिवाय या चित्रपटामध्ये सलमान पाच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याचंही म्हटलं जात आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘दबंग 3’ च्या चुलबुलला टक्कर देणार साऊथचा सुपरस्टार खलनायक


दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा


दबंग गर्ल सोनाक्षी करतेय नवोदित अभिनेत्याला डेट