दबंग गर्ल सोनाक्षी करतेय नवोदित अभिनेत्याला डेट

दबंग गर्ल सोनाक्षी करतेय नवोदित अभिनेत्याला डेट

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) आता सिंगल नाही असं जर सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ना? पण होय हे खरं आहे. सोनाक्षीला तिच्या आयुष्यात खास माणूस सापडला आहे. एका नवोदित अभिनेत्याला सोनाक्षी डेट करत असून लवकरच आपलं नातं सर्वांसमोर कबूल करेल असं सगळ्यांना वाटत आहे. सध्या सोनाक्षी या नवोदित अभिनेत्याची भेटगाठ चांगलीच वाढली असल्याचं समोर येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण आहे हा नवा कलाकार? तर आम्ही तुमची प्रतीक्षा जास्त ताणणार नाही. हा नवोदित कलाकार आहे तो म्हणजे झहीर इकबाल (Zaheer Iqbal).


salman-khan-zaheer-iqbal


सोनाक्षी आणि झहीर सध्या बऱ्याच ठिकाणी एकत्र


सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सलमान खानला बॉलीवूडमध्ये येणाऱ्या नवोदित कलाकारांचा गॉडफादर म्हटलं जातं. सलमानने अनेक नव्या कलाकारांना या इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशाही दिली. यामध्ये सोनाक्षी सिन्हाचं नाव तर आहेच. पण आता त्यामध्ये त्याच्या मित्राचा मुलगा झहीर इकबालच्या नावाचाही समावेश झाला आहे. इतकंच नाही तर मोहनीश बहलची मुलगी प्रनूतनदेखील झहीरबरोबरील या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार असून लवकरच त्यांचा ‘नोटबुक’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झहीर सध्या आपल्या चित्रपटासाठी तर चर्चेत आहेच पण त्याचबरोबर सोनाक्षीबरोबरही त्याचं नाव जोडलं जात आहे.


दोघांच्यामधील दुवाही सलमानच


sonakshi-sinha-with-zaheer-khan
सध्या याच गोष्टीची चर्चा आहे. सोनाक्षी आणि झहीर या दोघांची पहिली भेटदेखील सलमानमुळेच झाली आहे. झहीर गेल्या काही वर्षांपासून सलमानकडून अभिनय आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण घेत आहे. त्याचवेळी सोनाक्षी आणि झहीर या दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन नंतर दोघंही एकमेकांना आवडू लागले असंही सांगितलं जात आहे. तसं तर हे दोघंही सार्वजनिक ठिकाणी एकत्र जास्त दिसले नाहीत. पण जेव्हा कधी यांना पाहिलं आहे तेव्हा एकत्रच पाहिलं गेल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या वाढदिवसालादेखील हे दोघं एकत्र असल्याचं पाहण्यात आलं. दोघेही एकाच कारमधून आले असल्याचं दिसून आलं होतं. तेव्हाच या दोघांमध्ये नक्की काहीतरी शिजत असल्याच्या बातम्यांनाही ऊत आला.


सोशल मीडियावर शेअर केला फोटो
सोनाक्षी आणि झहीरच्या सायलंट अफेरची चर्चा तर आहेच. पण सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या दिवशीदेखील खास अंदाजामध्ये झहीरने शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्येदेखील दोघं एकमेकांचे अगदी खास मित्र असल्याचं दिसून येत आहे.


sonakshi-sinha-with-zaheer-iqbal 


सोनाक्षी लवकरच प्रदर्शित होणाऱ्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'कलंक' चित्रपटामध्ये दिसणार असून झहीर आणि प्रनूतचा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. झहीर आणि सोनाक्षीचं नक्की काय कनेक्शन आहे हे आता येणारा काळच सांगेल. पण तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक विषय मिळाला आहे हे नक्की.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


समीराने केलं ट्रोलर्सचं तोंड बंद, म्हणाली मी करिना नाही


लागीरं फेम शिवानी बावकरचा वाढदिवस साजरा, सहकलाकारांनी दिलं ‘शितली’ला सरप्राईज


बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा