Love Aaj Kal 2 च्या ट्रेलरवर सैफने दिली ही प्रतिक्रिया...

Love Aaj Kal 2 च्या ट्रेलरवर सैफने दिली ही प्रतिक्रिया...

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा Love aaj kal 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरची अनेकांना प्रतिक्षा होती. कारण या पूर्वी आलेल्या Love aaj kal मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी दिसली होती. त्यामुळे वडिलांनंतर आत मुलगी याच चित्रपटाच्या सिक्वेन्समध्ये दिसणार म्हटल्यावर तुलना तर होणारच. त्यातच या ट्रेलरविषयी जेव्हा सैफ अली खानला विचारण्यात आले त्यावेळी त्याने दिलेली प्रतिक्रिया ही नक्कीच जाणून घेण्यासारखी होती. म्हणून आज जाणून घेऊया नेमकं सैफला हा ट्रेलर पाहिल्यानंतर काय वाटले?

रिंकू राजगुरूने केलं 20 किलो वजन कमी, केला डाएट प्लॅन शेअर

काय म्हणाला सैफ

Instagram

2009 साली Love aaj kal आला होता. या चित्रपटातील गाणी आणि रोमान्स लोकांना चांगलाच आवडला होता. पण या नव्या पर्वाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मात्र अनेक नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांना हा ट्रेलर कळलाच नाही. तर साराच्या फॅन्सना मात्र या ट्रेलरनंतर निराश केले. ट्रेलर कसा वाटला हा प्रश्न ज्यावेळी सैफला विचारण्यात आला त्यावेळी त्याने मला माझ्या चित्रपटाचा ट्रेलर मला जास्त आवडल्याचे सांगितले. शिवाय यावर अजून काय बोलावे… माझ्याकडून या दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. सैफचे हे उत्तर एकप्रकारे ट्रेलरबद्दल असमाधानच अधिक दाखवताना दिसत आहे. 

साराच्या फॅन्सची निराशा

Instagram

केदारनाथ आणि सिंबा यांसारख्या दमदार चित्रपटातून सारा अनेकांच्या मनात बसली होती. स्टारकिड असूनही तिच्या अभिनयामुळे तिने अनेकांची मतं जिंकली होती. खुलेपणाचे बोलणाऱ्या साराने या आधी कार्तिक आर्यन आपल्याला आवडत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना चित्रपटाची उत्सुकता होती. पण या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर मात्र लोकांच्या डोक्याला अधिक ताप झाला आहे. ट्रेलरमध्ये एकाचवेळी दाखवण्यात येणाऱ्या दोन लव्हस्टोरी आणि त्यांचा संबंध फारसा लक्षात येत नाही. त्यामुळे साहजिकच हा ट्रेलर आहे की, आणखी काही हे कळत नाही. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी यावरुन MEME बनवायला सुरुवात केली आहे. हेच MEME आता ट्रेलरपेक्षा अधिक चालायला लागले आहेत. 

शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न

सारा पाडू शकली नाही छाप

Instagram

साराच्या अभिनयाबाबत अनेक जण नेहमीच पॉझिटिव्ह असतात. पण या ट्रेलरनंतर अनेक जण निराश झाले आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे ट्रेलर चांगले नाही की, साराचा अभिनय चांगला नाही. असा प्रश्न अनेकांना यामध्ये पडू लागला आहे. सारा या चित्रपटात इतकी गोंधळलेली दिसत आहे. शिवाय या दोघांच्या तोंडी असलेले डायलॉगही गोंधळून टाकणारे आहेत. 


एकूणच काय Love aaj kal 2 च्या ट्रेलरने अनेकांना गोंधळात टाकले आहे. येत्या 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण या गोंधळलेल्या ट्रेलरनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हा थोडासा प्रश्नच आहे. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/