दंगल गर्ल जायरा वसीमचा बॉलीवूड सोडण्याच्या पोस्टवर खुलासा,पुन्हा झाली ट्रोल

दंगल गर्ल जायरा वसीमचा बॉलीवूड सोडण्याच्या पोस्टवर खुलासा,पुन्हा झाली ट्रोल

काल सोशल मीडियावर दंगल गर्ल जायरा वसीमने एक अशी पोस्ट टाकली की, खळबळच माजली. अचानक तिच्यासोबत असे काय झाले की, तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली. सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता जायरा वसीमकडून या पोस्टवर खुलासा करण्यात आला आहे.जायरा वसीम हिने ही पोस्ट लिहिली नसून तिचे अकाऊंट हॅक झाल्याचे जायराच्या मॅनेजरकडून सांगण्यात आले आहे. पण आता जायराने या सगळ्याला कलाटणी देत माझे अकाऊंट हॅक झाले नसल्याचे ट्विट करुन म्हटले आहे.

अकाऊंट झाले हॅक

Instagram

सोमवारी जायरा वसीमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक भली मोठी पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टसाठी तिने कोणतीही कॅप्शन लिहिलेली नाही. त्यामुळे तिचे अकाऊंट हॅक तर झाले नाही या अशी शंका येऊ लागली. तिच्या बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. पण आता जायराच्या मॅनेजरनेच खुलासा केल्यामुळे तिचे अकाऊंट हॅक झाल्याचे कळत आहे. तिने अशा प्रकारची कोणतीही पोस्ट केलेली नाही. असे त्यांनी सांगितले आहे. पण जायराने मात्र तिच्या ट्विटवरुन अकाऊंट हॅक झाले नसल्याचे सांगितले आहे. ही पोस्ट तिने स्वत:च लिहिल्याचे म्हटले आहे. 

शाहीदच्या कबीर सिंहने दबंग खानलाही टाकले मागे

वाचा काय म्हणाली जायरा

Instagram

तर जायराने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे, 5 वर्षांपूर्वी मी बॉलीवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात काम केल्यानंतर मला खूप प्रसिद्धी मिळाली. मी अनेकांसाठी रोल मॉडेल झाले. पण मला हे कधीच करायचे नव्हते. हा माझा मार्ग नाही. हे मां काम नाही. त्यामुळे आज माझ्या बॉलीवूड येण्याला 5 वर्ष पूर्ण झाली आहे. मी या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे. माझ्या कामातून मला आनंद मिळत नाही. या कामामुळे माझे अनेक ठिकाणी दुर्लक्ष झाले. यासाठीच मला यातून बाहेर पडायचे आहे.

शाहीद कपूरने या अभिनेत्रीसोबत करावे काम... चाहत्यांची मागणी

बॉलीवूड सोडण्याला धर्माचा रंग

जायरा वसीम ही काश्मिरची आहे. तिच्या या पोस्टनंतर त्याला उगाचच धर्माचा रंग देण्यात आला आहे. तिला अनेक व्हेरिफाईड अकाऊंटवरुन धार्मिक रंग देण्यात आला आहे. अल्ला तुला मार्ग दाखवेल किंवा अल्ला तुला आनंदी ठेवेल. अशा काही कमेंट त्या पोस्टवर करण्यात आल्या आहेत.

शाहीदला करिनाने दिलं होतं लग्नाचं आमंत्रण?

जायराने ट्विटकरुन केला खुलासा

जायराने या ट्विटकरुन तिचे अकाऊंट हॅक झाले नाही असे सांगितले आहे. इतर कोणावरही विश्वास ठेवू नका. मी माझे अकाऊंट स्वत: पाहते आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. या शिवाय तिने इन्स्टाग्राम पोस्टची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे.

जायराला नेटीझन्सनी फटकारले

जायराने मुस्लिम धर्माची कास धरत मी माझ्या धर्माविरोधात काम केले आहे. आता मला माझा मार्ग सापडला आहे. असे म्हटले आहे. तिच्या या विधानावर नेटीझन्स चिडले असून मुस्लिम धर्मात सोशल मीडियाचा वापरही लिहिलेला नाही. मग तू या सगळ्या ठिकाणांहून रजा घे असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या तिच्या या पोस्टवर फारच निगेटीव्ह कमेंटस आलेल्या आहेत. त्यामुळे आता जायराने काय ते समोर .येऊन बोलणे गरजेचे आहे. दरम्यान जायरा द स्काय इज पिंक नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.हा तिचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय हा एक स्टंट असल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. बरं ही तिच जायरा वसीम आहे जिने काही महिन्यांपूर्वी प्रवासात कोणीतरी छेड काढल्याचा आरोप करत एक व्हिडिओ केला होता. ज्यावेळी ती खूप ट्रोल झाली होती.

आता एवढ्या सगळ्या तमाशानंतर खरं खोटं जायराचं जाणे...