फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चेहरे असतात जे काही कळासाठी सुपर हिट होतात. पण त्यांचे अस्तित्व या इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ टिकून राहात नाही. अमिषा पटेल ही देखील त्यापैकीच एक. ती आली तिने पाहिलं आणि तिनं जिंकलं असे म्हणत ती अल्पावधीत सुपर हिट अभिनेत्री ठरली. तिने केलेले त्या काळातील काही चित्रपट सुपरडुपर हिट झाले. त्यानंतर ती काही काळासाठी गायबसुद्धा झाली. पण तिने अशा काही चुका केल्या की, त्यानंतर ती इंडस्ट्रीमधून बाहेर पडली ती कायमचीच. पण अमिषा पटेलकडून अशी काय चूक झाली की तिची कायमच इंडस्ट्रीमधून हकालपट्टी झाली. जाणून घेऊया अमिषा पटेल विषयी माहीत नसलेल्या गोष्टी
मेकर्सना टॅलेंटपेक्षा गरिबीचे प्रदर्शन दाखवायला आवडते, गायक अभिजीत सावंतचा खुलासा
आरोपांवर आरोप
‘कहोना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेत्री अमिषा पटेल हीने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती रातोरात प्रसिद्ध झाली. तिने केलेल्या या चित्रपटातून तिला इतकी प्रसिद्धी मिळाली की, त्यावेळी ती एकमेव नावाजलेली अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. पण ही प्रसिद्ध फार काळ टिकली नाही. कारण तिने एक मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान तिने तिच्या आई-वडिलांवर थेट आरोप केले. तिचे आई-वडील तिच्या पैशांचा गैरवापर करत असल्याचे तिने सांगितले. तिने थेट कुटुंबावर केलेले आरोप आणि कौटुंबिक भुमिका साकारणारी अमिषा यामध्ये फारच फरक पडला. जो खरंतरं कोणालाही पटण्यासारखा नव्हता.त्यामुळे तिची प्रतिमा ही दिवसेंदिवस निगेटिव्ह होत गेली. त्याचाच परिणाम तिला पुढे काम मिळेनासे झाले.
दिग्दर्शकासोबतचे नाते खटकले
आई-वडिलांवर केलेले आरोप हे इतक्यावरच ती थांबली नाही. अमिषाचे एका दिग्दर्शकासोबत असलेले अफेअर देखील खूपच गाजले होते.ज्यामुळेही तिच्या पालकांचा याला विरोध होता. तिच्या आईने तिला घरातून हाकलून काढले याचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. त्यानंतर तिची प्रतिमा अधिकच मलीन होत गेली. त्यामुळेच तिला पुढे काही कामही मिळेनासे झाले. पुढे त्या दिग्दर्शकासोबत तिचे ते नाते टिकलेही नाही. पण अमिषाला काम मिळणे कायमचेच बंद झाले
इस्लाममधील स्त्रियांच्या अस्तित्वावरुन प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्याला गौहरने असे उत्तर
काही चित्रपटांनी दिला आधार संपले स्टारडम
अमिषाचा हा वाद खूप विकोपाला गेला असला तरी देखील तिला आधाराला काही चित्रपट नक्कीच मिळत होते. पण ज्या ऐटीने तिने मुख्य अभिनेत्री या रुपात जी एंट्री केली होती. तसे चित्रपट तिला पुढे कधीच मिळाले नाही. त्यापुढे तिला मिळालेल्या भूमिका या थोड्या व्हिलन गटातीलच होत्या त्यामुळे त्यानंतर तिला काहीही प्रसिद्धी मिळाली नाही. सध्या ती एखाद्या आयटम गर्लप्रमाणेच काम करते. तिचा आताचा अंदाज हा फार बोल्ड झालेला आहे. तिला कामाची गरज आहे हे तिच्या पोस्टवरुन नक्कीच कळते. तिने केलेल्या काही बोल्ड फोटो खाली कार्यक्रमांच्या सुपारीचे मेसेज असतात. शिवाय तिच्या मॅनेजरचा नंबरही दिलेला असतो. इतकेच नाही तर या व्यतिरिक्तही अमिषा अनेक वादांमध्ये कायम अडकलेली आहे.
आता अमिषासारखे स्टारडम पाहिलेल्या अभिनेत्रीच्या बाबतीत ही गोष्ट होऊ शकते. म्हणजे नव्या येणाऱ्या अभिनेत्रींनी याची काळजी घ्यायलाच हवी.