वरुण धवन आणि गर्लफ्रेंड नताशाचं शुभमंगल लवकरच

वरुण धवन आणि गर्लफ्रेंड नताशाचं शुभमंगल लवकरच

वरुण धवन बॉलीवूडच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. त्याच्या सेलिब्रिटी आणि फिमेल फॅन फॉलोईंगचा अनुभव नुकताच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला होता. जरी अनेक मुलींच्या हृदयाची धडधड वरूणला पाहून वाढत असली तरी वरूणच्या हृदयात मात्र फक्त त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल आहे.


Varun Dhawan Wedding Cover 8369919


नताशा दलाल ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे आणि सूत्रानुसार हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.   


वडील डेव्हीड धवन यांनी केलं शिक्कामोर्तब
 

 

 


View this post on Instagram


 

 

follow me here @realdaviddhawan


A post shared by David Dhawan (@realdaviddhawan) on
वरूण धवनचे बाबा आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हीड धवन यांनी लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत डेव्हीड धवन यांनी सांगितलं की, पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये वरूण आणि नताशाचं लग्न होईल. मी त्यांच्या या निर्णयाने खूष आहे. एका पित्याला अजून काय हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण अजून त्यांनी लग्नाच्या तारखेबाबत मात्र कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, त्यांना वरूण आणि नताशाच्या नात्याबाबत काहीच प्रोब्लेम नाही.


वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी


काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की, यावर्षीच वरूण आणि नताशाचं शुभमंगल पार पडेल. पण याबाबत एका इंटरव्ह्यूत वरूणने सांगितलं की, तो या वर्षी लग्न करणार नाही. कारण त्याच्या अनेक आगामी चित्रपटाचं त्याला शूटींग पूर्ण करायचं आहे. मी लग्नगाठीत अडकण्याआधी मला माझे प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे आहेत.   


वरुण आणि नताशाची लव्ह स्टोरी


Varun Dhawan Wedding


वरुण धवन आणि नताशा दलालची लव्ह स्टोरी खूप जूनी म्हणजे अगदी त्यांच्या लहानपणापासूनची आहे. मैत्रीने सुरू झालेल्या या नात्याचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. वरुण धवन बॉलीवूडमध्ये येण्याआधीच हे दोघं एकमेकांना डेट करत होते. या दोघांनीही कधीच आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला नाही. वरुण बऱ्याच सेलिब्रिटी इव्हेंट्सना नताशासोबत दिसतो. त्यांना अनेकदा डीनर किंवा पार्टीजमध्येही स्पॉट करण्यात आलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#ZAFAR #kalank 🔥🔥🔥@manishmalhotra05


A post shared by Varun Dhawan (@varundvn) on
वरूणच्या बॉलीवूड करिअरबाबत बोलायचं झाल्यास नुकताच त्याचा कलंक हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आणि वरूणच्या अभिनयाचं कौतुकही झालं. वरूण लवकरच "स्ट्रीट डान्सर 3D" या चित्रपटात झळकणार आहे. हा सिनेमा "ABCD2" चा सीक्वल आहे. आधीच्या सिनेमाप्रमाणेच यामध्येही वरूणसोबत श्रद्धा कपूरचीच जोडी असेल. याशिवाय वरूण लवकरच सारा अली खानसोबत "कुली नंबर 1" च्या रीमेकचं शूटींगही सुरू करणार आहे.


फोटो सौजन्य : Instagram