प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून जेव्हापासून दयाबेन गायब झाली आहे. तेव्हापासून ती शोमध्ये परत येणार की नाही, यावरून सतत चर्चा सुरू असते. कधी तिच्या रिप्लेसमेंटची बातमी येते तर कधी तिच शोमध्ये परत येणाबद्दल अफवा उठते. नुकतंच दिशाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीचा क्युट फोटो शेअर केला.
दयाबेनची क्युट मुलगी
दिशाने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा क्युट फोटो शेअर केला. दिशाच्या मुलीचं नाव स्तुती असं आहे. पाहा या आई आणि मुलीचा क्युट फोटो.
टीव्हीवरील सर्वात पॉप्युलर शो तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील दयाबेन (Disha Vakani) परत येण्याबाबत अनेकदा चर्चा होते. पण सर्वांची लाडकी दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी 2017 सालापासून मॅटर्निटी लीव्हवर आहे आणि त्यामुळेच अजूनही शोमध्ये परत आलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी ती परत येणार अशी बातमी आली होती. मात्र असं काही झालं नाही.
फॅनच्या प्रश्नावर भडकली दिशा
काही दिवसांपूर्वी दिशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फॅन्सना त्यांचे प्रश्न विचारायला सांगितले होते. त्यावर अनेक फॅन्सनी दिशाला प्रश्न पाठवले. पण एका फॅनच्या प्रश्नावर मात्र दिशा भडकली होती. त्या फॅनने असं लिहीलं होतं की, तुमच्यामध्ये ईतका ईगो असेल असं वाटलं नव्हतं. मॅम तुमचे फॅन्स तुम्हाला बोलवत आहेत आणि तुम्ही इतक्यातच थकलात. या प्रश्नावर मात्र दिशा भडकली आणि उत्तर दिलं की, कृपया मला स्पेस द्या.
दयाबेनचा शोध अजून सुरूच
दयाबेन आणि जेठालाल या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील जोडीला खूपच पसंती मिळाली होती. इतकी आजही लोक दयाबेनला मिस करतात. दिशा सप्टेंबर 2017 पासून शोमधून गायब आहे. पण आजपर्यंत तिची रिप्लेसमेंट करण्यात आलेली नाही. दिशाने नोव्हेंबर 2017 मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आणि तेव्हापासून ती सुट्टीवरच आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, सीरियलच्या मेकर्सनी दयाबेनच्या रोलसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला शोधायला सुरूवात केली आहे. तेव्हा दयाबेनच्या भूमिकेसाठी पापड पोल मधील अभिनेत्री अमी त्रिवेदीला विचारण्यात आल्याचं कळलं होते. पण अमीने मात्र या बातमीला दुजोरा दिला नव्हता.
दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका
आता दयाबेन सीरियलमध्ये कधी येईल ते माहीत नाही पण निदान तोपर्यंत तिच्या फॅन्सनी तिचं आईपण तिला अनुभवू द्यावं हे मात्र नक्कीच खरं आहे. तुम्हाला काय योग्य वाटतं?