दीपिका आणि रणबीरच्या या व्हिडिओने केली या चित्रपटाची आठवण ताजी

दीपिका आणि रणबीरच्या या व्हिडिओने केली या चित्रपटाची आठवण ताजी

रणबीरसोबत केलेली जाहिरात, ऋषी कपूर यांची घेतलेली भेट यामुळे दीपिका आणि रणबीर त्यांचा मागचा काळ विसरुन पुढे गेले आहेत. पण त्यांनी केलेला एक एव्हरग्रीन चित्रपट आजही  लोकांच्या लक्षात आहे. तो म्हणजे ‘ये जवानी हे दिवानी’...या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाला आज 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील प्रसिद्ध गाण #balampichkari हे गाणे नव्या पिढीला माहीत नाही असे होणार नाही. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणबीर या गाण्यावर थिरकले होते. त्याच गाण्याचा व्हिडिओ आज सगळीकडे व्हायरल होत आहे. या गाण्याची आठवण ताजी करुन देणारा आणि तो चित्रपट आठवून देणारा असा हा  व्हिडिओ आहे.


का रडली दीपिका 'छपाक' च्या सेटवर


व्हिडिओ आहे जुना

तसं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे. 64 व्या फिल्मफेअर अॅवार्डच्या वेळी व्हॅनिटीमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. यात दीपिका काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तर रणबीरही अॅवार्डसाठी तयार झालेला दिसत आहे. या  व्हिडिओमध्ये नैना (दीपिका) आणि बनी (रणबीर) दोघे या चित्रपटातील #balampichkari या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये रणवीर सिंहसुद्धा होता आणि तो दीपिकाला यावेळी चिअर देखील करत होता.त्यानंतर या व्हॅनिटी व्हॅनमध्ये विकी कौशल आणि रणवीरची गर्लफ्रेंड आलियादेखील आले होते असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी या गाण्यावर धम्माल केल्याचे कळते.


चाहत्यांनी केला व्हिडिओ Repost

Subscribe to POPxoTV

ये जवानी है दिवानी या चित्रपटाची प्रसिद्धी इतकी होती की, कित्येक वर्ष अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये बनी आणि नैनाचे वेड होते. या चित्रपटातील दीपिका आणि रणबीरची केमिस्ट्री अनेकांना आवडली होती. म्हणूनच हा चित्रपट खूपच चालला. आता या चित्रपटाला 6 वर्ष पूर्ण झाली म्हटल्यावर हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा त्यांच्या फॅन्सनी Repost करत या चित्रपटाची आठवण ताजी करुन दिली.


दीपिकाला मिळाली कपूर कुटुंबियांकडून अशी भेटवस्तू


ब्रेकअपनंतर केला होता चित्रपट


YJHD


रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाचे रणबीर कपूरसोबत सूत जुळले होते. पण त्यांचे नाते अचानक तुटले. ही दोघं लग्न करतील असे अनेकांना वाटले होते पण अनेकांची निराशा झाली. पण महत्त्वाची गोष्ट अशी की, त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतरच त्यांनी हा चित्रपट केला होता. पण त्यांनी सेटवर किंवा चित्रपटात अशी कुठेच जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी त्यांच्या या चित्रपटाबाबत फारच प्रोफेशनल होते. त्यामुळेच ही कलाकृती आजही अनेकांच्या लक्षात आहे आणि कायम लक्षात राहील.


दीपिका ‘छपाक’मध्ये व्यग्र


deepika


अॅसिड  हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या जीवनावर आधारीत ‘छपाक’ नावाचा चित्रपट सध्या दीपिका करत आहे. तिने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शुटींग सुरु असून  लवकरच तो फ्लोअरवर येणार आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर सध्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘ब्रम्हास्र’ या चित्रपटात व्यग्र आहे. हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांचे आहेत. 2020मध्ये हे चित्रपट रिलीज होणार अशी माहिती सध्या तरी समोर येत आहे.


प्रेग्नंसीबाबत दीपिकाचा मोठा खुलासा


(सौजन्य-Instagram, youtube)