दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड चढणार बोहल्यावर, फेब्रुवारीमध्ये लग्न ?

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड चढणार बोहल्यावर, फेब्रुवारीमध्ये लग्न ?

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर रणबीर कपूर आला असेल तर थोडं थांबा. पण हा एक्स बॉयफ्रेंड रणबीर नाही तर दुसराच कोणीतरी आहे. दीपिकाचे करिअरच्या सुरुवातीच्या काळात या मॉडेलसोबत अफेअरदेखील होते. आता लक्षात आले का? हा मॉडेल आणखी कोणी नसून निहार पांड्या आहे. आता दीपिकाचा हा एक्स बॉयफ्रेंड कोण? ते तुम्हाला कळले. पण निहार जिच्यासोबत लग्न करतोय ती व्यक्तिही तितकीच खास आहे. ‘इश्व वाला लव्ह’ या गाण्याची गायक निति मोहन… बसला ना आणखी एक धक्का! हो पण हे खरे आहे. दीपिकाच्या लग्नानंतरच निहारच्या लग्नाची चर्चा होऊ लागली होती. पण आता हे जोडपं फेब्रुवारीमध्ये विवाहबंधनात अडकत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


जाणून द्या दीपिका-रणवीरच्या लग्नाविषयी सगळे काही 


दोघांनी लपवून ठेवले नातेneeti mohan


खरंतर दीपिकाच्या लग्नसराईच्या काळात तिच्या एक्स- रिलेशनशीप संदर्भात सोशल मीडियावर भरभरुन लिहिले गेले. त्यात निहार पांड्यांचे नाव देखील होते. या दरम्यानच निहारच्या लग्नाची चर्चा देखील होऊ लागली. पण निहार पांड्या आणि नीति मोहन या दोघांकडूनही या नात्याचा खुलासा करण्यात आलेला नाही. अनेकांनी त्यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांनीही या संदर्भात  कोणालाच अधिकृत माहिती दिलेली नाही. इन्स्टाग्रामवर निहारने नीतिची बहीण मुक्तीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे नेमकं काय ते अद्याप उलगडू शकलेले नाही. पण नुकताच त्याचे एक व्हिडिओ साँग आले जे अभिनेत्री आणि नीति मोहनची बहीण मुक्तीसोबतचे आहेत. या शिवाय अनेक फोटोमध्ये नितिच्या बहिणींसोबत निहार पांड्या दिसला आहे. आता ही दोघे त्यांच्या नात्यासंदर्भात कधी खुलासा करतात याची वाट फॅन्स देखील पाहत आहेत.

सिनेमात करतोय डेब्यु


नीति मोहन कोण हे सांगण्याची आता कोणालाच गरज नाही. कारण तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. पण निहार पांड्याची मॉडेल व्यतिरिक्त अशी काहीच ओळख नाही, असे दिसत असले तरी त्याला कमी समजू नका कारण कंगना रणौतच्या आगामी मणिकर्णिका या सिनेमात तो दिसणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निहारच्या करिअरला वेगळे वळण मिळणार आहे, असे म्हणायला हवे. 'मणिकर्णिका' सिनेमातील त्याची भूमिका कोणती हे स्पष्ट होऊ शकली नसली तर २०१९ सालातील हा बिग बजेट सिनेमा आहे. ज्याचा फायदा निहारला प्रसिद्धी मिळण्यासाठी होईल हे मात्र नक्की!


रणवीर- दीपिकाच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 


 दीपिका-निहारची लव्हस्टोरी


१० वर्षांपूर्वी दीपिका आणि निहारची भेट झाली. ते एकाच अॅक्टिंग स्कुलमध्ये होते. तिथेच त्यांच्यातील ओळख वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण १० वर्षात दीपिकाच्या  करिअर ग्राफ पाहिला तर तिला चांगल्या सिनेमातून काम करण्याची संधी मिळाली. पण निहारला त्यामानाने चांगली काम मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढत गेले. साहजिकच त्यांचे नाते टिकले नाही.त्यानंतर दीपिकाची नावे अनेक अभिनेत्यांसोबत जोडली गेली. यात निहार पांड्या, सि्द्धार्थ माल्या, युवराज सिंह आणि रणबीर कपूर यांच्यासोबत जोडली गेली आहेत. पण अखेर २०१८च्या शेवटाला दीपिकाने तिचा पार्टनर म्हणून रणवीर सिंहची निवड केली आणि त्याच्यासोबत ती  लग्नबंधनात अडकली.


पाहा ईशा अंबांनीच्या लग्नाचा थाट 


mukti mohan with nihaar pandya


 (सौजन्य- Instagram)