दीपिका कक्कर इब्राहिम ‘Bigg Boss 12’ची विजेती

दीपिका कक्कर इब्राहिम ‘Bigg Boss 12’ची विजेती

‘बिग बॉस’चे सर्वच सीझन नेहमीच गाजत असतात. यावर्षी हा सीझन गाजवला तो म्हणजे खेळाडू श्रीशांत आणि अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिमने. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमधून टीव्ही जगतात प्रवेश केलेल्या दीपिका कक्कर इब्राहिमने ‘बिग बॉस १२’ ची विजेती होण्याचा मान मिळवला असून सलमान खानने याबद्दल माहिती दिली. हा संपूर्ण सीझन भांडणाने गाजला. मात्र दीपिकाने आपल्या सामंजस्याने आणि सर्वांशी चांगलं वागून दीपिकानं सर्वांचीच मनं जिंकली असं म्हणायला हवं. ‘बिग बॉस १२’ नक्की कोण जिंकणार याची सगळीकडेच चर्चा होती. सध्या सोशल मीडियाचं माध्यम खूप मोठं असल्यामुळे हा सीझन सुरु झाल्यापासून दीपिकाच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि दीपिकाने सर्व चर्चा खऱ्या ठरवत त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.


bigg boss winner deepika
श्रीशांत आणि दीपिकाचं अनोखं नातं


संपूर्ण सीझनमध्ये दीपिका आणि श्रीशांतने एकमेकांना खूपच चांगली साथ दिली. इतकंच नाही तर दीपिकाने श्रीशांतला भाऊ मानत नेहमीच त्याला प्रत्येक टास्कमध्ये उत्कृष्ट साथ दिली आणि श्रीशांतनेदेखील दीपिकाची काळजी घेतलेली नेहमीच प्रेक्षकांना दिसून आली. फायनलमध्ये शेवटीदेखील हीच जोडी उरली त्यामुळे आता नक्की कोण विजेता होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र श्रीशांतला मागे टाकत ही बाजी दीपिकाने मारली. विजेत्याचं नाव घोषित करतेवेळी बिग बॉसच्या घरातील लाईट्स बंद करून येण्यासाठी सलमानने दीपिका आणि श्रीशांतला सांगितलं. दोघंही घराबाहेर आल्यानंतर सलमानने पहिले दीपिकाची मस्करी करत नावाची उत्सुकता ताणून ठेवली. मात्र शेवटी तिचं नाव घोषित केल्यावर दीपिकाला अतिशय आनंद झाला. श्रीशांतनेही यावेळी दीपिकाचं अभिनंदन केलं. श्रीशांत ‘बिग बॉस १२’ चा उपविजेता स्पर्धक ठरला.


shreeshant and deepika
105 दिवसांचा खेळ


‘बिग बॉस १२’ मध्ये संपूर्ण सीझन कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी अगदी पहिल्या दिवसापासून गाजत होता. या शो च्या फायनलमध्ये दीपिका कक्कर इब्राहिम, श्रीशांत, करणवीर बोहरा आणि दीपक ठाकूर यांची वर्णी लागली होती. प्रत्येक टास्कमध्ये जीव ओतून काम करणाऱ्यांपैकी हे चारही लोक होते. मात्र पहिल्या दिवसापासून दीपिका आणि श्रीशांतने लक्ष वेधून घेतलं होतं आणि इतर स्पर्धकांनाही हे दोघं या सीझनमध्ये विजेते ठरतील असंच वाटत होतं. श्रीशांतपेक्षाही विजेत्या पाटीवर दीपिका आपलं नाव कोरणार असं बऱ्याच जणांना वाटत होतं आणि दीपिकाने ते सिद्धही करून दाखवलं. शोएब इब्राहिमशी लग्न झाल्यानंतर काही दिवसातच दीपिका ‘बिग बॉस १२’ मध्ये गेली होती. शोएबने वेळोवेळी दीपिकाला पाठिंबा दिला. अगदी सोशल मीडियावरदेखील शोएब दीपिकाला सतत पाठिंबा देत होता. 105 दिवसांचा खेळ दीपिकाने अप्रतिम प्रदर्शन करत जिंकला.


shoiab deepika


मागच्या सीझनमध्येदेखील शिल्पा शिंदे विजेती ठरली होती. तिनेदेखील दीपिकाप्रमाणेच घरामध्ये सर्वांशी चांगलं वागून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. पहिल्या दिवसापासून दीपिकाने आपण जसे आहोत तसंच घरामध्ये वावर राखला. त्यामुळे घरातल्यांचं आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्यास तिला मदत झाली. लग्नानंतर काही दिवसातच दीपिका कक्कर इब्राहिमसाठी या घरामध्ये तीन महिने राहणं कठीण होतं. मात्र आपल्या नवऱ्याचा आणि त्याच्या घरातल्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचंही तिनं म्हटलं आहे. 


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम, https://www.instagram.com/explore/tags/biggboss12/