रोमँटिक चित्रपटात पुन्हा दिसणार ‘हे’ Ex-Couple, लवकरच करणार घोषणा

रोमँटिक चित्रपटात पुन्हा दिसणार ‘हे’ Ex-Couple, लवकरच करणार घोषणा

बॉलीवूडमध्ये एक्स कपल असणं आणि एक्स कपल्समध्ये मैत्री असणं यामध्ये नवं असं काहीच नाही. यामध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो दीपिका आणि रणबीरचा. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर ही अशी एक जोडी आहे जी ऑनस्क्रिन असल्यावर चित्रपट हिट होतोच. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे Ex-Couple पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमँंटिक चित्रपट घेऊन येणार आहेत. हा चित्रपट ‘सोनू के टिटू की स्वीटी’फेम दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच ही जोडी लव रंजनच्या घरीदेखील गेली होती. तेव्हा या जोडीचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे आता हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार असल्याचा कयास बांधला जात आहे. मात्र अजून याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

फेब्रुवारीपासून होणार चित्रीकरणाला सुरूवात

मिळालेल्या माहितीनुसार लव रंजनच्या या चित्रपटासाठी पुढच्या फेब्रुवारी महिन्यातील तारखा बुक करण्यात आल्या आहेत तर दीपिकाबरोबर लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरूवात करण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. हा एक रोमँटिक - कॉमेडी चित्रपट असून दोन्ही कलाकारांना या चित्रपटासाठी होकार दिला असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या हे दोघेही आपापल्या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. दीपिका ‘छपाक’ आणि ‘83’ या दोन्ही चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असून रणबीरदेखील त्याचे दोन्ही चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘शमशेरा’मध्ये व्यग्र आहे.  दीपिका आणि रणबीर नुकतेच एका जाहिरातीमध्येही झळकले होते. दीपिकाने रणवीरशी लग्न केल्यानंतरही रणबीरबरोबर तिची मैत्री कायम आहे. याआधी दोघांनी ‘बचना ए हसीनो’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये काम केलं असून या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. जर हा चित्रपट येणार असेल तर या दोघांचा हा चौथा चित्रपट असेल. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

दीपिका आणि रणबीरच्या या व्हिडिओने केली या चित्रपटाची आठवण ताजी

लव रंजनला दिला होता दीपिकाने नकार

काही दिवसांपूर्वी अशीही बातमी होती की, लव रंजनचं MeToo मध्ये नाव आल्यामुळे दीपिका पादुकोणने त्याच्याबरोबर काम करायला नकार दिला होता. पण असं काहीही नसून दीपिका या चित्रपटात लव रंजनबरोबर काम करण्यास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच लव रंजनचं नाव अशा प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.  

दीपिका आणि रणवीरचं नातं टिकलं कारण...

दीपिका आणि रणबीर आपापल्या आयुष्यात आनंदी

दीपिका आणि रणबीर यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण हा आता भूतकाळ असून ते दोघंही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. दीपिकाने सहा वर्ष रणवीरला डेट केल्यानंतर त्याच्याशी मागच्या वर्षी लग्न केलं. तर रणबीरदेखील आपली सध्याची गर्लफ्रेंड आलिया भटसह आनंदी असल्याचं त्यांच्या फोटोंमधून दिसून येत आहे. लवकरच हे दोघंही लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही आलिया नेहमी रणबीरच्या घरच्यांसहदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. त्यामुळे पुढच्या वर्षी ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघंही लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. मात्र नातं स्वीकारलं असलं तरीही लग्नाबाबत या दोघांनीही कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. 

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.