'कोरोना कर्फ्यू' लागण्याआधीच रणवीर आणि दीपिकाचा मुंबईला बायबाय

'कोरोना कर्फ्यू' लागण्याआधीच रणवीर आणि दीपिकाचा मुंबईला बायबाय

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी चाहीर करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवस राज्यभरात आता कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ज्यामुळे या काळात चित्रपट, मालिका आणि जाहीरातीचे शूटिंगदेखील बंद करण्यात आली आहे. या  काळात कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या काळात घरात अडकून पडू नये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादूकोनने लॉकडाऊनआधीच पहिली फ्लाईट पकडत मुंबईला बायबाय केलं आहे.

रणवीर आणि दीपिकाने का सोडली मुंबई

कोरोना कर्फ्यू लागण्याआधीच रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोन मुंबई एअरपोर्टवर आढळले. दोघांनीही यावेळी मॅचिंग आऊटफिट परिधान करत कपल गोल सेट केला होता. रणवीरने व्हाईट शर्ट आणि डेनिम जीन्स आणि जॅकेट परिधान केलं होतं. तर दीपिकाने देखील रणवीरप्रमाणेच आऊटफिट घातले होते. या आऊटफिट्सवर त्यांनी ब्राऊन कलरचे फूटवेअर घातले होते. दीपिकाने ब्राऊन कलरची हॅंडबॅग कॅरी केली होती. हातात हात घालत ही सेलिब्रेटी जोडी मुंबईपासून कुठेतरी दूर जाताना दिसली होती. मागच्या वेळी लॉकडाऊनमुळे रणवीर आणि दीपिका मुंबईत घरात अडकून पडले होते. त्यामुळे यावेळी सावधगिरी बाळगत त्यांनी लॉकडाऊनआधीच मुंबईला बायबाय करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिकाने लॉकडाऊनआधीच मिळेल त्या पहिल्या फ्लाईटने बॅंगलोरला रवाना झाले आहेत. 

रणवीर आणि दीपिका का झाले बॅगलोरला रवाना

बॅंगलोरमध्ये दीपिका पादुकोनचे कुटुंब राहते. सध्या लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि जाहिरातीचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला मुंबईतील घरात राहावे लागणार होते. मागच्या वेळी ते दोघं असंच मुंबईतील त्यांच्या घरात लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. तेव्हा दीपिकाला तिच्या आईवडीलांची खूप आठवण आणि काळजी वाटत होती. जेव्हा मागच्या वेळी लॉकडाऊनचे नियम शिथील झाले तेव्हा ती सर्वात आधी आईवडीलांना भेटण्यासाठी बॅंगलोरला रवाना झाली होती. यावेळेस मात्र लॉकडाऊनमध्ये अडकण्याआधीच रणवीर आणि दीपिकाने आपलं बॅंगलोरमधील घर गाठलं आहे. ज्यामुळे या काळात ते दीपिकाच्या आईवडीलांसोबत पुरेसा वेळ घालवू शकतात आणि त्यांची काळजीदेखील घेऊ शकतात. 

दीपिका आणि रणवीरला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक

दीपिका आणि रणवीर ही खऱ्या आयुष्याप्रमाणेच चित्रपटातील एक हिट जोडी आहे. या दोघांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. रणवीर आणि दीपिका लवकरच 83 या चित्रपटातून एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 1983 साली भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपची कहाणी असणार आहे. ज्यात रणवीरने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया साकारणार आहे. हा चित्रपट तयार होऊन आता जवळजवळ एक वर्ष उलटलं आहे. मात्र मागच्या वर्षीपासून झालेल्या कोरोनाच्या भीतीमुळे आणि त्यातून दोन वेळा झालेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख सतत पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र लवकरच हे संकट दूर होईल आणि रणवीर आणि दीपिकाला एकत्र चित्रपटात पाहण्याची संधी  त्यांच्या चाहत्यांना नक्कीच मिळेल. मात्र तोपर्यंत रणवीर आणि दीपिकाने मुंबईला बायबाय करण्याचा निर्णय घेतला आहे.