बॉलीवूडमधील नंबर 1 ची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणने मागच्या वर्षी गली बॉय अभिनेता रणवीर सिंगसोबत धूमधडाक्यात लग्न केलं. ज्यानंतर प्रत्येकालाच उत्सुकता होती ती या ‘पद्मावत’ अभिनेत्रीच्या पुढच्या चित्रपटाची.
View this post on Instagram#ranveersingh #deepikapadukone ❤️❤️😍😍 #sunday #weekend #instalove #instadaily #manavmanglani
ज्याबाबतचा खुलासा स्वतः दीपिकाने केला, तो म्हणजे दिग्दर्शक मेघना गुलजारचा एसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आगामी छपाक हा सिनेमा. यामधील दीपिकाचा लुक पाहिल्यावर तर सगळ्यांचीच उत्सुकता वाढली.
पण आता या चित्रपटाच्या शूटींगची गरमागरम चर्चा आहे ती किसिंग सीनमुळे. या चित्रपटाचं शूटींग होळीदरम्यान दिल्लीमध्ये सुरू झालं होतं. ज्याचे काही व्हिडीओ आणि फोटोजही लीक झाले होते. पण नुकताच या सिनेमातील एक ताजा व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सीमधील किसिंग सीन दिसत आहे.
खरंतर दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सी 'छपाक'च्या या सीनचं शूटींग एका घराच्या गच्चीवर सुरू होतं आणि तो सीन कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला. मग काय.. ज्याने हा व्हिडीओ शूट केला होता त्याने तो सोशल मीडियावर टाकला. लगेचच तो व्हिडीओ व्हायरल झाला. एवढंच नाहीतर त्याने व्हिडीओत असंही म्हटलं आहे की, 'हा व्हिडीओ मुलांना दाखवू नका.'
प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा
View this post on Instagram
असं नेहमीच दिसून येतं की, लग्नानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्री चित्रपटात नो किसिंग पॉलिसी फॉलो करू लागतात. पण छपाक मधील या व्हायरल झालेल्या व्हिडीओने दीपिकाने अशा नियमांना फॉलो न करण्याचं ठरवल्याचं दिसतंय. तसंच यावरून हेही कळतंय की, तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगलाही तिच्या अशा सीन्सबाबत काही प्रॉब्लेम नाही. ही बॉलीवूड आणि दीपिकाच्या फॅन्ससाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. यामुळे करीना कपूर खान नंतर दीपिका पदुकोणचा या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. ज्या नवीन विचारसरणीच्या असून प्रगतीशील दृष्टीकोन ठेवतात.
हेही वाचा -
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र