फक्त फॅनसाठी दीपिकाने एअरपोर्टवर केलं असं बर्थडे सेलिब्रेशन

फक्त फॅनसाठी दीपिकाने एअरपोर्टवर केलं असं बर्थडे सेलिब्रेशन

फॅन फॉलोविंग असावं तर दीपिकासारखं. जगभरात तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. पण या पुढे तिच्या माणुसकीचेही अनेकजण चाहते होणार आहेत. रविवारी म्हणजेच 5 जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दिल्या. पण तिचे एक्सक्लुझिव्ह फोटो काढणारे फोटोग्राफरही तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. तिच्या या खास फॅनसाठी दीपिकाने चक्क एअरपोर्टवर असं काही केलं की, सगळ्यांच्या मनात दीपिकाने नक्कीच आणखी जास्त जागा मिळवली असणार. फक्त एका फॅनसाठी दीपिकाने काय केलं ते आता जाणून घेऊया.

2020 मध्ये रिंकूची सैराट सुरूवात

दीपिकाने चक्क फॅनसाठी हे केलं

दीपिका आणि रणवीर सिंह एअरपोर्टवर दिसल्यानंतर तिच्या वाढदिवसासाठी एका फोटोग्राफरने खास केक आणला होता. तो केक तिने कापावा अशी त्याची इच्छा होती. तो दीपिका समोर गेला त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक पुढे केला. त्याचं ते प्रेम पाहून या जोडीने आहे त्या जागी एअरपोर्टवरच केक कापला.इतकंच नाही तर केक कापताना या फोटोग्राफर मंडळींनी छान गाणंही वाजवलं. यावेळी त्या फोटोग्राफरला साक्षात दीपिका केक कापत आहे यावर विश्वास बसत नव्हता. त्याचा हात थरथर कापत होता. यात भर म्हणून की काय दीपिकाने केक कापून त्याला भरवलासुद्धा. तिच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आनंद रणवीरला इतका होत होता की, तो मस्त हा क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. 

मोठ्या ब्रेकनंतर घेऊन येत आहे ‘छपाक’

Instagram

रणवीरसोबत लग्न केल्यानंतर दीपिका चित्रपटात दिसली नव्हती. पण ती चांगल्या प्रोजेक्टवर काम करत आहे हे मात्र कळत होतं. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारीत चित्रपटात दीपिका दिसणार हे कळल्यानंतर आणि मेघना गुलजार यांचा चित्रपट असणार म्हटल्यावर तो हिट चित्रपट असणार यात काही शंकाच नव्हती. पण एका सत्य घटनेला पडद्यावर उतरवणे अत्यंत कठीण असते. पण दीपिकाच्या या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर हा चित्रपट आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या कमाईचा भाग वगळला तर दीपिका या चित्रपटाशी आणि या पात्राशी इतकी भावनिकरित्या जोडली गेली आहे की चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिला अनेकदा रडू आवरले नाही. त्यामुळेच तिची मेहनत अधिक चांगल्या पद्धतीने चित्रपटात दिसून आली आहे असेच म्हणावे लागेल. 

प्रेग्नंसीच्या चर्चेला मिळाला ब्रेक

Instagram

 आता राहिला विषय या चर्चांचा तर आता सध्या या सगळ्या गोष्टीला ब्रेक मिळाला आहे. मध्यंतरी दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. तिने बॉडी हगिंग ड्रेस घातल्यामुळे त्यातून तिचं पोटं थोडं पुढे आलेलं दिसलं बसं मग त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. पण आता मात्र या गोष्टींना पूर्णपणे ब्रेक लागला आहे. 

अनन्या' आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती

रणवीरही मेगा हिटच्या तयारीत

2020 हा या जोडप्यासाठी खास असणार आहे. एकीकडे दीपिकाचा ‘ छपाक’ दुसरीकडे रणवीर सिंहचा  वर्ल्ड कपवर आधारीत 83 आणि सूर्यवंशी या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. सूर्यवंशमचा एक लुक या आधीच सोशल मीडियावर रिलीज झाला होता. 

एकूणच काय दीपिकाचा वाढदिवस एकदम खास झाला आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/