'83': दीपिका पादुकोनचा फर्स्ट लुक रिलीज, चाहत्यांना आता प्रतीक्षा ट्रेलरची

'83': दीपिका पादुकोनचा फर्स्ट लुक रिलीज, चाहत्यांना आता प्रतीक्षा ट्रेलरची

बॉलिवूडची 'शांती' दीपिका पादुकोन (Deepika Padukone) बहुचर्चित-बहुप्रतीक्षित सिनेमा '83' मध्ये कपिल देव (Kapil Dev) यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. सिनेमातील रणवीर सिंहचा (Ranveer Singh) पहिला लुक सोशल मीडियावर खूप दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला. मात्र दीपिकाच्या लुकबाबत सिनेमाच्या टीमनं कमालीची गुप्तता पाळली होती. पण अखेर दीपिकाचा फर्स्ट लुक (First Look) सिनेरसिक आणि चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आला आहे. कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' सिनेमामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

(वाचा : समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

'83' मधील दीपिका पादुकोनचा लुक 

दीपिका पादुकोननं इन्स्टाग्रामवर '83' सिनेमातील आपला फर्स्ट लुक शेअर केला आहे. फोटोमध्ये रणवीर सिंह कपिल देव आणि दीपिका पादुकोन कपिल यांच्या पत्नी रोमी भाटियांच्या (Romi Bhatia) भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमातील दीपिकाचा लुक आतापर्यंतच्या सर्व सिनेमांच्या तुलनेत अतिशय निराळा आहे. फोटोमध्ये शॉर्ट हेअर कट, हायनेक टॉप अशा हटके लुकमध्ये दिसणाऱ्या दीपिकानं रणवीरचा हात अतिशय प्रेमानं पकडला आहे. फोटोमध्ये दोघांची लई भारी केमिस्ट्री दिसत आहे. 

(वाचा : नवाजुद्दीन सिद्दकीने पहिल्यांदा शेअर केला खऱ्या आयुष्यातील गुरूजींचा फोटो)

आपल्या भूमिकेबाबत दीपिकानं सांगितलं की, 'क्रीडा विश्वाच्या (Cricket World Cup 1983) इतिहासात सर्वाधिक प्रतिष्ठित क्षणावर साकारलेल्या सिनेमामध्ये छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका निभावणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. एका पतीच्या व्यावसायिक आणि खासगी इच्छा-आकांक्षा यशस्वी होण्यामागे एका पत्नीची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते, हे मी माझ्या आईला पाहत मोठी झाले आहे. त्या प्रत्येक महिलेला 83 सिनेमा समर्पित आहे, जी स्वतःच्या स्वप्नांपेक्षा आपल्या पतीच्या स्वप्नांना प्राधान्य देते'.

(वाचा : बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर)

सिनेरसिक ट्रेलरच्या प्रतीक्षेत

रणवीर आणि दीपिकाचे चाहते ‘83’ सिनेमाच्या ट्रेलरची अतिशय आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा सिनेमा 10 एप्रिल रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. टीम इंडियानं 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. याच ऐतिहासिक घटनेवर 83 सिनेमाची कहाणी आधारित आहे. बॉलिवूडसह क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी रणवीर केलेल्या कायापालटामुळे तो हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे.  रणवीर, दीपिका व्यतिरिक्त सिनेमामध्ये ताहीर राज भसीन, साकिब सलीम, आदिनाथ कोठारे यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. कबीर खान त्यांच्या अॅक्शन पॅक्ड आणि क्रीडा विश्वासंदर्भात चित्रपटांसाठी ओळखले जातात. 

(वाचा : मलायकासारखी फिगर हवीय, पाहा तिच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा VIDEO)

हे देखील वाचा :

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.