बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर

बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर

बॉलिवूडची ‘शांती’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘छपाक’ सिनेमा 10 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. ‘छपाक’मध्ये मांडण्यात आलेला अ‍ॅसिड अटॅक पीडित तरुणीचं आयुष्य आणि तिचा संघर्ष सर्वदूर पोहोचावा यासाठी दीपिका सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अशाच एका प्रमोशनदरम्यान पत्रकाराला दीपिकाच्या रागाचा सामना करावा लागला. मुलाखतीदरम्यान दीपिकाला प्रेग्नेंसीच्या अफवांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर दीपिकानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रेग्नेंसीच्या प्रश्नावरून दीपिका झाली नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीमध्ये पत्रकारानं दीपिकाला प्रेग्नेंसीसंदभात प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच दीपिकाच्या रागाचा पारा चढला. तिनं थेट पत्रकाराला उत्तर देत म्हटलं की, 'तुम्हाला मी प्रेग्नेंट दिसत आहे का? तुम्हाला विचारूनच मी फॅमिली प्लानिंग करेन. तुमची परवानगी मिळाल्यानंतर मी प्लानिंग करेन. जर मी प्रेग्नेंट झाले तर सर्वांना नवव्या महिन्यात माहिती समजेलच'.

(वाचा : दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला...)

'छपाक'साठी दीपिकानं घेतलीय प्रचंड मेहनत

'छपाक' सिनेमामध्ये दीपिका अ‍ॅसिड अटॅक पीडित तरुणी लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. लक्ष्मीचा संघर्ष या सिनेमाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

(वाचा : धुरळा ! छोट्या लता दीदीनं गायलं अरिजितचं सुपरहिट गाणं)

प्रथमच विक्रांत मेसीबरोबर दिसणार दीपिका

विक्रांत मेसीने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दीपिकाबरोबर विक्रांत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. छोट्या पडद्यावर विक्रांतच्या कामाची नेहमीच प्रशंसा करण्यात आली आहे. शिवाय वेबसीरिजमध्येही विक्रांतचं बरंच नाव आहे. छपाकमधील भूमिका विक्रांतच्या करिअरला वळण देणारी ठरू शकते.

(वाचा : गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार एकत्र)

सिनेमा ‘83’मध्येही झळकणार दीपिका

छपाकनंतर दीपिकाचा '83' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  ‘83’ या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा आहे. याचं चित्रिकरण पूर्ण झालं असून एप्रिल 2020 मध्ये हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडसह क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी रणवीर केलेल्या कायापालटामुळे तो हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.