देशभरात कोणत्या सेलिब्रेटीची काय ब्रॅंड वॅल्यू आहे हे फार महत्त्वाचं ठरतं. आजच्या घडीला सर्वात जास्त ब्रॅंड वॅल्यू असण्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने जगभरातील सर्व सुपरस्टार्संना मागे टाकलं आहे. कारण सध्या दीपिका पदूकोण देशातील नंबर वन सेलिब्रेटी बॅंड ठरली आहे. सेलिब्रेटी ब्रॅंडची वॅल्यूवर नजर असलेल्या डफ अॅंड फेल्पसच्या आकडेवारीनुसार दीपिकाची ब्रॅंड वॅल्यू 10 करोड डॉलर म्हणजेच 700 करोड झाली आहे. मागील वर्षी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीजमध्येदेखील दीपिका पहिल्या क्रमांकावर होती. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपिकाने मागच्या वर्षी 113 करोडची कमाई केली होती. आता सेलिब्रेटी ब्रॅंड वॅल्यूच्या तुलनेत तिने क्रिकेटपटू एम. एस धोनी, अभिनेता अमिर खान आणि पती रणवीर सिंग यांना सुद्धा मागे टाकलं आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली मात्र सेलिब्रेटी ब्रॅंड वॅल्यूमध्ये तिच्या जवळपास पोहचला आहे.
दीपिका पदुकोणने मागील वर्षी जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या ब्रॅंडसाठी काम करणारी जगभरात दीपिका एकमेव सेलिब्रेटी ठरली आहे. क्रीडा विश्वातील सेलिब्रेटी विराट कोहली दीपिकाच्या मागोमाग इतक्या प्रमाणावर जाहीरातीत काम करण्यात यशस्वी ठरला आहे.
दीपिकाच्या वाढत्या ब्रॅंड वॅल्यूप्रमाणेच तिने स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली झाली आहे. फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स सोबतच ती आता योगर्टच्या बिझनेसम्ध्येदेखील गुंतवणूक करत आहे. व्यावसायिक सूत्रांनूसार दीपिकाच्या ज्या स्टार्ट अप बिझनेसमध्ये गुंतवणूक करते त्या बिझनेसची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केलेली असते.
दीपिका आजच्या घडीला एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय तिने तिच्या अॅक्टिंग करिअरमध्येदेखील तिने एक विशिष्ठ उंची गाठली आहे. मागच्या वर्षी 14-15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने इटलीमधील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी खाजगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतर एका कार्यक्रमात चुकीच्या पोझमुळे तिच्या बेबी बंपच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या असल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. यासाठी दीपिका म्हणाली की, ‘मी कधी ना कधी आई होणारच आहे. कोणत्याही विवाहीत महिलेवर किंवा जोडप्यावर आईवडील होण्यासाठी दबाव टाकणं चुकीचं आहे.’ दीपिका पुढे हेही म्हणाली की, ‘ज्या दिवशी महिलांना आई होण्याबाबतचा प्रश्न विचारणं सोडून दिलं जाईल त्या दिवशी आपल्या समाजात नक्कीच चांगला बदल घडून येईल.’ साहजिक सेलिब्रेटी ब्रॅंड नंबर वन दीपिकाचा फोकस सध्या कामावरच राहणार आहे. लग्नानंतर तिचं वजन वाढलं असल्यामुळे ती सध्या तिच्या फिटनेसकडेही जाणिवपूर्वक लक्ष देत आहे.
View this post on Instagram
प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा
First Look : 'छपाक' मध्ये अशी दिसणार दीपिका पदुकोण
Video : आगामी ‘छपाक’मधील दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेस्सीचा किसिंग सीन
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम