अबब! आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन

अबब! आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही अशी जोडी आहे जी सगळ्यांनाच आवडते. आजपर्यंत बॉलीवूडमध्ये तीन चित्रपटांमध्ये या जोडीने काम केलं आहे आणि हे तिनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे हिट ठरले आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री रिअल आणि रिल लाईफमध्ये बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडते. दीपिका रणवीरची रिअल पत्नी तर आहेच पण पडद्यावरदेखील ती त्याच्या पत्नीची भूमिका करणार आहे. दीपिका नुकतीच कबीर खान दिग्दर्शित चित्रपट ‘83’ च्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे. तिचे आणि रणवीरचे फोटोही व्हायरल होत आहेत. दोघेही नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहेत. आतापर्यंत एकत्र काम केलेल्या चित्रपटांमध्येही कधीही या दोघांचं मिलन झालेलं नाही. पण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने या जोडीचं पडद्यावर मिलन होणार आहे हे नक्की. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटासाठी दीपिकाला नक्की किती मानधन मिळालं आहे. ही रक्कम ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. दीपिकाने आपल्या मेहनतीने आज बॉलीवूडमध्ये हे स्थान मिळवलं आहे आणि त्यामुळेच अगदी लहान भूमिकेसाठीदेखील तिला इतकी मोठी रक्कम देण्यात आल्याचं सध्या म्हटलं जात आहे. दीपिका आणि रणवीर ही जोडी प्रेक्षकांमध्ये हिट असल्यामुळेच या चित्रपटासाठी दीपिकाला विचारण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. 

Instagram

दीपिकाला मिळाले तब्बल 14 कोटी

दीपिका पादुकोण ही बॉलीवूडमधील टॉप हिरॉईन्सपैकी एक आहे. नुकतंच तिने मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून आता ती आपला पती रणवीर सिंगबरोबर लंडनमध्ये ‘83’ चित्रपटाचं चित्रकरण करण्यासाठी गेली आहे. पण या चित्रपटासाठी तिला तब्बल 14 कोटी मानधन मिळालं असल्याची बातमी आहे. वास्तविक हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. त्यामुळे दीपिकाला या चित्रपटामध्ये जास्त मोठी भूमिका नाही. त्यामुळे दीपिका आधी ही भूमिका करण्यास तयार नव्हती. पण नंतर तिने भूमिका करण्याचं मान्य केलं. हा चित्रपट भारताने पहिल्यांदा जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित असून रणवीर सिंग यामध्ये भारतीय कप्तान कपिल देव यांची भूमिका साकारत आहे आणि त्यांच्या पत्नीची भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिकाला रणवीर सिंगने या भूमिकेसाठी तयार केलं असंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ही भूमिका अतिशय लहान असून वर्ल्ड कपच्या काळात कपिल देवच्या मागे त्यांची पत्नी कशी उभी राहिली आणि तिने त्याना कसा मानसिक आधार दिला याविषयी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. कबीर खानने याआधी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले आहेत.  

Instagram

दीपिका लवकरच दिसणार एका समर्थ भूमिकेत

खरं तर संजय लीला भन्सालींच्या राम - लीला, बाजीराव - मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांमधून तिने प्रत्येक भूमिका अतिशय समर्थपणे साकारली आहे. तर आता लवकरच अॅसिड  अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेतून ‘छपाक’मधून दीपिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेता विक्रांत मेसीबरोबर दीपिका काम करणार आहे. प्रेक्षकांना आतापासूनच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तर आता रणवीर आणि दीपिकाचं लग्न झाल्यानंतर एक वेगळीच केमिस्ट्री बघण्यातही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

हेदेखील वाचा -

फिट राहण्यासाठी करिना करते 'ही' कठीण योगासने

सारा अली खानने केला ब्रायडल लुक शेअर, लग्नासाठी आले प्रपोजल्स

कोणाची झाली इतकी हिंमत की मारली प्रियांका चोप्राच्या थोबाडीत!