बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची रिया चक्रवर्तीकडे कसून चौकशी केल्यानंतर आता बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची नावं यामध्ये समोर आली आहेत. यात काही बड्या अभिनेत्रींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सिमोन खंबाटा ही काही नावं सातत्याने प्रकाशझोतात आल्यानंतर आणि काही ड्रग्ज प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्यानंतर आता NCB च्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी आता दीपिका, सारा आणि रकुल प्रीत सिंह मुंबईत दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाचे चॅट वायरल झाले होते. त्या काही पुराव्यांच्या आधारावर तिला समन्स ही बजावण्यात आला होता. हे कलाकार मुंबईत दाखल झाल्याचे अनेक फोटोही सध्या सोशल मीडियावर आहेत.
दीपिकाने ड्रग्जची मागणी केल्याचे पुरावे
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने ड्रग्जच्या दिशेने वळण घेतल्यानंतर बी टाऊनमधील ड्रग्ज प्रकरणाची अधिक कसोशीने चौकशी NCB कडून करण्यात येऊ लागली. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावे जोडली गेली. बॉलिवूडची दिवा अशी ओळख असलेल्या दीपिका पदुकोणचे नाव यामध्ये कधी येईल असे वाटले नव्हते. पण दीपिकाने 2017 साली केलेल्या एका चॅटमुळे अनेकांना धक्का बसला. दीपिकाने जया सहा या सुशांतच्या मॅनेजरशी संबधित व्यक्तिशी या संदर्भात चॅट केले होते. हे चॅट वायरल करण्यात आले. त्यामुळेच या यादीत आणखी एक नाव जोडले गेले. दीपिका पदुकोण शूटिंगसाठी गोव्यात गेली आहे. त्यानंतरच तिला समन्स बजावण्यात आला. पण आता दीपिका चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली आहे. पती रणवीर सिंहसोबत ती एअरपोर्टवर दिसली.
कपिल शर्माने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, असा घालावा मास्क
रकुल प्रीतही मुंबईत दाखल
सातत्याने येणारे आणखी एक नाव म्हणजे रकुल प्रीत सिंह. तिचे नाव देखील ड्रग्जच्या बाबतीत सारखे पुढे येत होते. तिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हैदराबादवरुन ती मुंबईत दाखल झाली आहे. रकुल प्रीत संदर्भात आतापर्यंत कोणतेही पुरावे मीडियापुढे आलेले नाही. पण ड्रग्जमध्ये तिचेही नाव असल्याने तिला चौकशीसाठी आता बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ती यासाठी मुंबईत आल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसत आहे.
Good News: अजून एका अभिनेत्रीने गरोदर असल्याचे केले जाहीर, फोटो व्हायरल
साराही आली मुंबईत
तर दुसरीकडे सारा अली खान ही सुद्धा गोव्यामध्ये शूट करत आहे. तिचेही सतत सुशांत प्रकरणात नाव गोवण्यात आले आहे. सुशांत प्रकरणाने ज्यावेळी ड्रग्जकडे वळण घेतले त्यावेळी या ड्रग्ज सेवनामध्ये सारा अली खान सातत्याने नाव घेतले जात होते. रियाने देखील काही सेलिब्रिटींची नाव दिली यामध्ये तिचे नाव असल्याचे म्हटले जात होते.त्यामुळे चौकशीसाठी तिलाही बोलावण्यात आले आहे. गोवा एअरपोर्टवर तिला पाहिल्यानंतर अनेकांनी तिचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी साराने तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. एरव्ही पापाराझींशी अगदी अदबीने वागणारी सारा यावेळी तोंड लपवताना दिसल्यामुळे अनेकांनी तिच्या या व्हिडिओवरही कमेंट केल्या आहेत.
दीपिका, रकुल प्रीत, सारा याव्यतिरिक्त आणखीही काही सेलिब्रिटींची चौकशी सुरुच आहे. आता या तीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर काय सत्य समोर येणार ते लवकरच कळेल.
अनुराग कश्यपविरोधात या अभिनेत्रीची अखेर पोलिसात तक्रार, बलात्काराचा आरोप