#JNU विद्यार्थ्यांसाठी दीपिका पोहोचली दिल्लीत पण…

#JNU विद्यार्थ्यांसाठी दीपिका पोहोचली दिल्लीत पण…

देशभरात सध्या जो काही गोंधळ सुरु आहे तो सगळ्यांनाच परिचित असेल. दिल्लीतील JNU या विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध अनेकांनी केला.त्यात बॉलीवूडही मागे नाही. अनेक कलाकारांनी या विद्यापीठात येत कोणतीही परिस्थिती जाणून न घेता येथील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आता या यादीमध्ये आणखी एका मोठ्या सेलिब्रिटीची भर पडणार आहे ती म्हणजे दीपिका पदुकोण. मंगळवारी संध्याकाळी दीपिकाने #JNU विद्यापीठाला भेट दिली आणि जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. पण असे करत असताना दीपिकाने कटाक्षाने एक गोष्ट टाळली ती म्हणजे नारेबाजी… आजूबाजूला होणाऱ्या नारेबाजीमध्ये दीपिका सहभागी झाली नाही हे प्रकर्षाने निदर्शनास आले. जाणून घेऊया नेमकं काय घडलं ते...

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा नवा विक्रम

दीपिकाने टाळला संवाद

View this post on Instagram

#deepikapadukone stands for JNU 👍

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी CAA विरोधात आवाज उठवला आहे. कोणतीही माहिती न घेता त्यांनी मीडियाला बाईटसुद्धा दिल्या आहेत. पण दीपिका या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ते तिच्या कालच्या वागण्यातून पटकन लक्षात आले. दीपिका JNU कॅम्पसमधील जवाहरलाल विद्यालयात आली. तिने जखमी मुलीची भेट घेतली. पण तिने यावेळी तिने काहीही न बोलणं पसंत केलं. दीपिका आली त्यावेळी तिथे नारेबाजी सुरु होती. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला जात होता. पण त्यावेळी दीपिका काहीही बोलली नाही. तिने यावेळी चुप्पी साधली तिने काहीही न बोलणे पसंत केले. त्यामुळे सध्या ज्या बातम्या फिरत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असेच म्हणावे लागेल.

प्रमोशनसाठी दीपिका होती दिल्लीत

दीपिका सध्या बीझी आहे ती फक्त तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये. ‘छपाक’ हा चित्रपट रिलीज होणार असून गेले दोन दिवस ती दिल्लीमध्ये प्रमोशन करत आहे. अॅसिड हल्ल्यावर हा चित्रपट असून ही लक्ष्मी अग्रवालची या मुलीची गोष्ट आहे. अॅसिड हल्ल्यानंतर बदलणारे आयुष्य आणि त्यातून होणारा संघर्ष मेघना गुलजार यांनी या चित्रपटात साकारला आहे. पण आता दीपिका स्वत:च्या फायद्यासाठी गेली अशा गोष्टींना ही उधाण आले आहे. पण दीपिकाने मात्र या कोणत्याच गोष्टीत काहीही न बोलण्याचाच निर्णय घेतला आहे.

शाहरूख खानसोबत झळकणार आमिर खानची ही हिरोईन

रविवारी झाला होता हल्ला

सिटीझन अमिटमेंट अॅक्ट (CAA) विरोधात काही विद्यापीठांमधून विरोध केला जात आहे. त्यापैकीच एक आहे दिल्लीमधील JNU विद्यापीठ. रविवारी या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी हल्ला केला या हल्ल्यांनंतर देशभरातून अनेकांनी आवाज उठवला. हल्लेखोर चेहरा लपवून आल्यामुळे त्यांच्याबद्दल अद्याप कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळेच ही खदखद सतत बाहेर पडत आहे. 


आता राहिला मुद्दा दीपिकाच्या समर्थनाचा तर दीपिकाने अशी कोणतीही मतं दिलेली नाही.त्यामुळे गैरसमज पसरणव्याची गरज नाही आणि गैरसमज करुन घेण्याचीही गरज नाही.


#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/