कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा

कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा

नुकताच मेट गालामध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवल्यानंतर आता दीपिका आणि प्रियांकाने आपल्या जबरदस्त फॅशनने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. 72 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या खास कार्यक्रमामध्ये दीपिका पदुकोण ब्लॅक आणि ऑफव्हाईट कॉम्बिनेशन कस्टम डन्डान्सच्या कपड्यांमध्ये गुरूवारची संध्याकाळ खूपच सुंदर घालवली असं म्हणावं लागेल. दीपिकाच्या या रेड कार्पेट लुकने सर्वांनाच तिच्या अजून प्रेमात पाडलं आहे. या अप्रतिम लुकमुळे दीपिकाने पुन्हा एकदा रेड कार्पेटवर तिच्या फॅशनला कोणीही टक्कर देऊ शकत नाही हे दाखवून दिलं आहे. यापूर्वीदेखील दीपिकाने आपल्या लुक्समुळे कान्समध्ये जादू केली होती.


दीपिकाचा स्टनिंग लुक


cannes 1


दीपिकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर 72 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने ब्लॅक आणि ऑफव्हाईट रंगाचं कॉम्बिनेशन घातलं असून कस्टम डन्डान्सचे हा ड्रेस डिझाईन केला आहे. डिपनेक ड्रेसवर तिने डायमंड अर्थात हिऱ्याचे दागिने परिधान केले आहेत. तर हाय पोनीटेल, हिल्स, ड्रॉप डँग्लर ज्वेलरी असा साज दीपिकाने केला असून तिच्या मेकअपनेदेखील सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. यावेळी तिने कॅटआईज लायनर आणि बाकी सिंपल मेकअप असा लुक ठेवला असून तिला हा संपूर्ण पेहराव खूपच चांगला दिसत आहे. हा सर्व लुक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने आपल्या या अप्रतिम ड्रेसवर मोठा बो देखील फ्लॉंट केला आहे.  यामुळे तिच्या लुकला अधिक शोभा आली आहे. सर्वात प्रभावशाली जागतिक आयकॉन असलेल्या यादीमध्येही दीपिकाने आपल्या लुक्समुळे जागा पटकावली आहे. लेडी गागा, रिहानासारख्या इंटरनॅशनल फॅशन आयकॉनमध्ये दीपिकाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. तर यावेळीदेखील तिच्या लुकवर रणवीर सिंहने अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, जेणेकरून रणवीर दीपिकाच्या किती प्रेमात आहे ते कळेल. ‘क्लोज अप तो बनता है’ असं कॅप्शन दीपिकाने एका फोटोला दिलं असून त्यावर रणवीरने ‘और पास’ असा रिप्लाय करत नॉटीनेसदेखील दाखवून दिला आहे.


प्रियांकाचा पहिल्यांदाच कान्समध्ये बोलबाला


cannes 2


प्रियांकाचादेखील लुक अगदी स्टनिंग असून यावर्षी पहिल्यांदा प्रियांका चोप्रा कान्समध्ये पहिल्यांदाच आपल्या ‘फॅशन’चा जलवा दाखवत आहे. यावेळी प्रियांकाच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांकाने यावेळी ग्लिटरी गाऊन घातला असून अतिशय मिनिमल मेकअप लुक प्रियांकाने फ्लाँट केला आहे. यामध्ये प्रियांकाने लक्ष सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांका चोप्राने यावेळी मेकअप करताना नेगेटिव्ह स्पेस आयलायनरचा वापर केला आहे. तर तिच्या या ग्लिटरी गाऊनचा रंग तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत आहे. शिवाय प्रियांका यामध्ये अगदीच वेगळी दिसत असून तिची हेअरस्टाईलही नेहमीपेक्षा वेगळी आहे.


कंगनाने केला भारतीय फ्युजन लुक


cannes 3


कंगनाने यावेळी भारतीय फ्युजन लुकला पसंती दिली. तिने गोल्डन कांजीवरम साडी परिधान केली असून त्यावर तिने कॉर्सेट घातला आहे. तर हातावर तिने फुल ग्लोव्ह्ज घातले असून केसांची स्टाईलही तिने जुन्या पद्धतीची केली आहे. अजूनही कंगनाचा मणिकर्णिका अवतार पाहायला मिळत आहे. पण नेहमीप्रमाणेच तिने यावेळीही कान्समध्ये आपल्या लुकची चर्चा कायम ठेवली आहे. यावेळी कंगनाचा मेकअप लुक करताना डिफाईन्ड ब्रो, क्लासिक बार लायनर, पिची पिंकची गालावर शेड, तर तिचे डोळे उठून दिसावेत यासाठी न्यूड आयलायनरचा वापर करत नैसर्गिक लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा


मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार खलनायिका


'संजीवनी'चे डाॅक्टर्स करणार आता ‘इश्कबाजी’