दीपिका पदुकोण की प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण ठरली बाॅलीवूडची सर्वात सुंदर नववधू

दीपिका पदुकोण की प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण ठरली बाॅलीवूडची सर्वात सुंदर नववधू

2018 सालात बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी लाखो चाहत्यांचे हृदय तोडत लग्नबंधनात अडकल्या. दीपिकाचं लग्न इटलीतल्या सुंदर लेक कोमो येथे झालं तर प्रियांकाचं लग्न भारतातील जोधपूर इथल्या प्रसिद्ध उमेद भवन पॅलेस येथे झालं. प्रियांका आणि दीपिाका, दोघाींमध्ये सुरूवातीपासूनच साम्य दिसलं आहे. पहिल्यांदा दोघीही एकत्र बाजीराव-मस्तानी या चित्रपटात दिसल्या, त्यानंतर दोघींनी एकत्रच हॉलीवूडचा रस्ता धरला. करियरप्रमाणेच दोघींच्या लग्नातही खूप साम्य दिसलं. जसं दोघींनीही आपलं लग्न खूप प्रायव्हेट ठेवलं आणि फक्त काही कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघींनी वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केली. याशिवाय दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा, दोघांच्या लग्नाचे कपडेही प्रसिद्ध फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केले होते. मग अशा परिस्थितीत या दोघींच्या ओव्हरऑल लुकबद्दल चर्चा करणं साहजिक आहे. चला तर मग पाहूया दीपिका पदुकोण आणि प्रियांका चो्प्राच्या लेहंग्यापासून ते ब्रायडल मेकअपपर्यंतचा प्रत्येक लुक, जो बघून तुम्हाला ही कळेल की, कोणती अभिनेत्री तिच्या नववधूच्या लुक दिसली सर्वात सुंदर.   


लग्नाचा पेहराव
सगळ्यात आधी बघूया लग्नाचा पेहराव. दीपिका पदुकोणचं लग्न कोंकणी आणि सिंधी पद्धतीने झालं. कोंकणी लग्नात दीपिकाने आई उज्ज्वला पदुकोणने गिफ्ट केलेली लाल आणि सोनेरी कांजीवरम साडी नेसली होती तर सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात दीपिकाने फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेला सुंदर लेहंगा घातला होता. त्यांच्या लुकला अजून आकर्षक बनवण्यासाठी सब्यसाचीने लहंगाच्या ओढणीवर ‘सदा सौभाग्यवती भवः’असंही लिहीलेलं होतं.


Deepika Konkani Wedding


Deepika lehnga 1


तर दुसरीकडे प्रियांकाने ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने निक जोनासबरोबर लग्न केलं. ख्रिश्चन लग्नात प्रियांकाने आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाईनर रॉल्फ लॉरेनने डिझाईन केलेला सुंदर पांढरा गाऊन घातला होता तर हिंदू लग्नात तिने फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेला लाल लेहंगा घातला होता. दीपिकाप्रमाणेच सब्यसाचीने प्रियांकाच्या लेहंग्यावरही काहीतरी लिहलं होतं, पण यावेळी सदा सौभ्यावती भवः नाहीतर निक जोनासचं पूर्ण नाव निकोलस जोनास असं लिहलं होतं.


Priyanka Wedding Dress


Priyanka Wedding Lehenga


ब्रायडल मेकअप
दीपिका आणि प्रियांका दोघीही त्यांच्या लग्नात सुंदर दिसत होत्या. कोंकणी लग्नात दीपिका पदुकोण दाक्षिणात्य पद्धतीने नटलेली दिसली. या प्रसंगी दीपिकाचा ब्रायडल मेकअप केला होता मेकअप आर्टिस्ट संध्या शेखरने. संध्याने दीपिकाचा मेकअप खूपच साधा ठेवला होता. दीपिकाच्या दागिन्यांबद्दल बोलायचं झालं तर या लग्नात दीपिकाने टीपिकल दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने घातले होते. तर सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात तिने सब्यसाचीने डिझाईन केलेले दागिने घातले होते. यावेळीही दीपिकाचा मेकअप संध्या शेखरनेच केला होता.  


Deepika Konkani Wedding


Deepika Indian Bridal look
प्रियांका चो्प्राचं लग्न दोन वेगवेगळ्या पद्धतीने झालं कारण दोघांचे धर्म वेगळे आहेत. म्हणूनच ख्रिश्चन लग्नात जिथे प्रियांकाचा लुक खूपच साधा होता तर हिंदू लग्नात प्रियांकाचा मेकअप हा मेकअप आर्टीस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने केला होता. या लग्नातही प्रियांकाचा मेकअप जास्त हेवी नव्हता. लाईट मेकअप आणि कपाळावर छोटीशी लाल बिंदीने तिचा लुक पूर्ण करण्यात आला होता. तर प्रियांकाचे दागिनेही सब्यसाचीने डिझाईन केले होते.  


priyanka-chopra-in-ralph-lauren-gown


Priyanka Indian Bridal look
तर आता तुम्हीच ठरवा दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रामध्ये कोणाचा ब्रायडल लुक तुम्हाला जास्त सुंदर वाटला. आम्हालाही नक्की सांगा.फोटो सौजन्य :  Instagram