हा आहे दीपिकाच्या आगामी 'छपाक' या चित्रपटातला फर्स्ट लुक. दीपिका पदुकोण सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘छपाक’ च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात दीपिका एका अॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे मेघना गुलजार.
View this post on Instagram
या फर्स्ट लुकमध्ये दीपिका बऱ्यापैकी लक्ष्मी अग्रवालसारखी दिसत आहे. या फर्स्ट लुक फोटोमध्ये दीपिका उदासही दिसत आहे पण तिच्या डोळ्यात एक उमेदही आहे. दीपिकाही पूर्णतः भूमिकेत शिरल्याचं एकूण चित्र आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात दीपिका पदुकोणच्या कॅरेक्टरचं नाव मालती असणार आहे. जिच्या आयुष्यातील अगणित संघर्षानंतरही तिने आपली लढाई कायम ठेवली. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोणने तिच्या स्वतःच्या बॅनरला ए एंटरटेनमेंटला सुरूवात केली आहे. हा चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. दीपिका या चित्रपटाच्या निमित्ताने दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे. निर्मातीच्या रूपात तिचा हा पहिलाचा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी दिसणार आहे. पण त्याच्या भूमिकेबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या चित्रपटातील भूमिकेच्या तयारीसाठी दीपिका पदुकोणने लक्ष्मी अग्रवालशी निगडीत सर्व ऑनलाईन माहिती आणि मीडियातील बातम्यांचा विस्तारितपणे अभ्यास केला. याशिवाय तिने व्यक्तिगतरित्याही लक्ष्मी अग्रवालशी याबाबत चर्चा केली. ज्यामुळे तिला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समजल्या आणि भूमिका समजून घेणं सोपं गेलं.
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दीपिकाचे चाहते फारच उत्सुक आहेत. त्यामुळे आता हा फर्स्ट लुक समोर आल्यामुळे चाहते आता या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा -
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र