मराठीत पहिल्यांदाच खास शूट करण्यात आलं ‘हिरोईन- इंट्रोडक्शन’ साँग

मराठीत पहिल्यांदाच खास शूट करण्यात आलं ‘हिरोईन- इंट्रोडक्शन’ साँग

बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये नवीन हिरोईन लाँच करताना तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवीन नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने डेब्यू करताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणं, हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. पण दिग्दर्शक संजय जाधव हे नेहमीच आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केलं आहे.

Subscribe to POPxoTV

7 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. यो (सचिन पाठक) ने लिहीलेल्या गीताला पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर गायिका शाल्मली खोलगडेने या गाण्याला आवाज दिला आहे.


बऱ्याच वर्षानंतर झाली इच्छापूर्ती


फिल्ममेकर संजय जाधव यांची या गाण्याच्या निमित्ताने खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली आहे, “बॉलीवूड आणि तामिळ सिनेमांमध्ये हिरोइनला लाँच करताना, तिचं पहिलं गाणं खूप स्पेशल असावं, यावर भर दिला जातो. पण मराठीत असं गाणं मी पाहिलं नव्हतं. फिल्ममध्ये लावणीने हिरोइनची एन्ट्री झालेली आहे. पण तिचा पहिला-वहिला सिनेमा असताना तिचं खास इंट्रोडक्शन करण्यासाठी कधी गाणं बनवलं गेलं नव्हतं. माझ्या हिरोईनचीही कधीतरी अशीही एन्ट्री व्हावी असं मला नेहमी वाटायचं. अभिनेत्री दिप्ती उत्तम डान्सर आहे. ती कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तर हिपहॉप आणि फ्री स्टाइल डान्सिंगही तिला खूप चांगलं जमतं. त्यामुळे मी माझी खूप वर्षांपासूनची ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँगची इच्छा ‘जी ले जरा’ गाण्याने पूर्ण केली.”


मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी गाण्याचं शूटींग


IMG-20190207-WA0008
‘जी ले जरा’ गाण्याच शूटींग हे खास मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणी करण्यात आलं आहे. जसं कालाघोडा, सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, मुंबई युनिव्हर्सिटी, सोफाया कॉलेज अशा ठिकाणी हे गाणं शूट करण्यात आलं आहे. दिप्ती सतीसोबत या गाण्यामध्ये सुमारे 50 डान्सर्स सहभागी झाले आहेत. या गाण्याच्या शूटूींगच्या अनुभवाबद्दल सांगताना सिनेमाचे निर्माते सुरज सिंग यांनी सांगितलं की, “मुंबईतल्या सर्वात जास्त वर्दळ असलेल्या भागात आम्ही हे गाणं चित्रीत केलं आहे. हे गाणं जरी आम्ही रविवारी चित्रीत केलं असलं तरी, या ठिकाणी रविवारी येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असते. जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांच्या जमावासमोर न विचलीत होता दिप्ती सतीने या गाण्याचं चित्रीकरण केलं. त्यामुळे मला तिचं कौतुक वाटतं.”


दीप्तीसाठी स्वप्नवत लाँच
अभिनेत्री दीप्ती सतीचा मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यातच तिच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिच्यासाठी खास हे गाणं शूट करण्यात आल्याने ती खूष आहे. दिप्ती याबाबत सांगताना म्हणाली की, “कोणत्याही अभिनेत्रीसाठी सिनेसृष्टीत असं लाँच मिळणं, हे स्वप्नवत आहे. त्यामुळे मी संजयदादांची खूप ऋणी आहे की, त्यांनी मला एवढ्या धमाकेदार एनर्जेटिक गाण्याने सिनेसृष्टीत लाँच केलं.”


IMG-20190207-WA0007


तसंच या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी विचारल्यावर दिप्तीने सांगितलं की, “गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पूर्ण केलं. या गाण्यात माझे बरेच चेंजेसही आहेत. त्यात गाण्याचे कोरीओग्राफर उमेश जाधव होते. त्यांच्या एनर्जीला मॅच करत, डान्स-स्टेप आत्मसात करत, भर-भर कपडे चेंज करत, गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करणं फारच चॅलेंजिंग होतं. पण आम्ही ते गाणं वेळेत पूर्ण केलं. मुख्य म्हणजे ते खूप छानही झालंय, त्यामुळे मला खूप समाधान आहे.”