एम-टाऊनच्या नव्या कपलचं सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन

एम-टाऊनच्या नव्या कपलचं सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन

दिप्ती सती आणि अभय महाजन हे एम-टाउनमधलं नवं कपल असल्याची सध्या चर्चा रंगतेय. आगामी ‘लकी’ चित्रपटातली ही लकी-जियाची जोडी ब-याचदा ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही एकत्रच असते. 29 जानेवारीला दिप्तीचा वाढदिवस असतो आणि अभयने दिप्तीचा हा वाढदिवस यंदा खूप रोमँटीक पध्दतीने साजरा केला.


आईसोबत केलं सरप्राईज प्लॅन

सूत्रांच्या अनुसार, अभयने दिप्तीचा वाढदिवस ब्रिंग-इन करण्याचा परफेक्ट प्लॅन तिच्या आईसोबत मिळून आखला होता. दिप्तीच्या आईला सांगून तिला मुद्दामहून बाहेर घेऊन जाण्यास सांगतिलं आणि तिथे अचानक तिच्या समोर येऊन खूप छान रोमँटिक सरप्राइज दिलं. एम-टाउनच्या ह्या नव्या कपलमध्ये फुलणारी मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे.


संजय जाधव यांच्या ‘लकी’ (Luckee) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज


दीप्तीचा बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी खास प्लॅन


deepti-sati-bthd-fb
अभयने या सरप्राईजबाबत दिलेली प्रतिक्रिया, “दीप्ती ही माझी लकी गर्ल आहे. त्यामुळे तिचा बर्थडे स्पेशल बनवायचा माझा प्लॅन होता. दिप्तीला सरप्राइज दिल्यावर तिचा चेहरा अगदी लहान मुलासारखा खुलतो.


IMG-20190129-WA0003


मी तिला मुद्दामू एका नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचं सांगितलं. त्यामुळे मी तिला असं काही सरप्राईज देईन अशी तिला अजिबात अपेक्षित नव्हती.”


‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज


बर्थडे गर्ल दीप्ती फिलींग ‘लकी’

'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक झालं रिलीज


दीप्ती या सरप्राईजने फारच खूष आहे. याबाबत सांगताना ती म्हणाली, “ मी खूप लकी आहे की, माझ्यावर एवढं प्रेम करणारी माणसं मला आयुष्यात मिळाली. रात्री 12 वाजता हातात फुलं घेऊन बर्थ डे विश करायला येण्याचं अभयच सरप्राईज मला खूप आवडलं. त्याला खूप रोमँटिक आईडिया सुचतात.”