शॉर्ट स्कर्ट घालणाऱ्या मुलींवर बलात्कार करा, असे म्हणणारी आंटी ट्रोल

शॉर्ट स्कर्ट घालणाऱ्या मुलींवर बलात्कार करा, असे म्हणणारी आंटी ट्रोल

आता आणखी एक व्हारल व्हिडिओ नेटीझन्सच्या रडारवर आला आहे तो एका आंटीचा… दिल्लीमधील या आंटी अशा काही बरळल्या आहेत की, लोकांनी त्यांना आता टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मुली असे लहान कपडे घालत असतील तर त्यांच्यावर बलात्कार करा… अशा प्रकारचे विधान केल्यामुळे ही आंटी सध्या चर्चेत आली आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहीजण या आंटीची बाजू घेत आहेत. तर काहींनी मात्र हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.


नेमंक काय झालं?


दिल्लीतील गुडगावस्थित मॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. एका शॉपिंग मॉलमध्ये ही महिला खरेदीसाठी आली होती. त्यावेळी शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुली त्यांना खटकल्या म्हणून त्यांनी थेट त्यांच्या कपडयांवरुन कमेंट केली. त्या म्हणाल्या की, असे शॉर्ट कपडे घालणाऱ्या मुलींवर पुरुषांनी बलात्कार करायला हवा. ही कमेंट ऐकल्यावर त्या मुलींनाही त्या महिलेचा राग आला.त्यांनी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मिडियावर टाकला.

नाही मागितली माफी


कपड्यांवरुन बलात्कार करा इतके लहान आणि वाईट विचार तुमचे कसे काय?असू शकतात. त्यामुळे या महिलेने सगळ्यांसमोर माफी मागावी असे या मुलींना वाटले म्हणून या मुलींनी या महिलेचा पाठलागही केला. पण इतके करुनही या महिलेने या मुलींची माफी मागितली नाही. या मुली तिच्या मागे व्हिडिओ करत सबंध मॉलमध्ये फिरल्या.पण ती माफी मागायला काही तयार नव्हती.  पण आता तिने माफी मागितल्याचे कळत आहे.


आंटी नेमकं काय म्हणाली?


viral aunty


लोकांनी तुमच्याकडे पाहावे म्हणून तुम्ही तोकडे कपडे घालता. असे तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवर पुरुषांनी बलात्कार करायला हवे. पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. आणि स्वत: चुकून उद्धटपणा करणाऱ्या या मुलींना त्यांच्या पालकांनी शिकवायला हवे.अशा प्रकारचे कपडे घालून तुम्ही बलात्काराला आमंत्रण देता.तुम्ही थोड्या दिवसांनी नग्न फिराल.


नेटीझन्सनी केले नोरालाही टार्गेट


कपड्यांमुळे बलात्कार होतात, या विधानावर आधीच खूप मोठी चर्चा झाली आहे. या विधानावर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. हा गहन विषय असताना.. नोरा फतेही या अभिनेत्रीने मात्र भलताच वाद ओढावून घेतला आहे. ती चक्क या आंटीच्या इंग्रजीवर बोलली आहे. या आंटीने इंग्रजीचाच बलात्कार केला अशा प्रकारची कमेंट करुन नेटीझन्सच्या रागाचे कारण झाली आहे. तिला रिप्लाय देताना अनेकांनी  असे म्हटले आहे की, ही जागा त्या महिलेची इंग्रजी चांगली की वाईट यासाठी नाही. जर तुला विषयाचे गांभीर्य कळत नसेल तर कृपा करुन तू यामध्ये बोलू नकोस.


 त्या मुलीने त्या ड्रेसचा फोटो केला शेअर

बरं ज्या मुलीसोबत ही घटना घडली. तिने स्वत: त्या दिवशी घातलेल्या ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत मी हा ड्रेस त्या दिवशी घातला होता. आता ज्या लोकांनी कमेंट केल्या आहेत. किंवा जे त्याबद्दल उलट बोलत आहेत .त्यांनी हा ड्रेस पाहावा.