ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘पवित्र रिश्ता 2’ बंद करण्याची मागणी, चाहते म्हणाले…

‘पवित्र रिश्ता 2’ बंद करण्याची मागणी, चाहते म्हणाले…

पवित्र रिश्ता ही हिंदी मालिकेने 2009 साली टेलीव्हिजनवर प्रदर्शित झाली होती. मालिका सुरू होताच काही दिवसांमध्येच या मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांच्या मनात घर केले. पाहता पाहता मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील स्टार कास्ट मराठी असल्यामुळे मराठी भाषिकांनाही ही मालिका चांगलीच  आवडली होती. या मालिकेतील मानव ही भूमिका सुशांत सिंह राजपूतने साकारली होती. आता सुशांत सिंह राजपूत या जगात नाही. पवित्र रिश्ताची लोकप्रियता पाहता सुशांतचे चाहते आणि मालिकेचा जुना टीआरपी पुन्हा मिळवण्यासाठी या मालिकेचा सीक्वल म्हणजेच पुढील भाग लवकरच सुरू केला जाणार आहे. ज्यामध्ये मालिकेतील सर्व जुने कलाकार जसं की अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारणर आहे. मात्र मानवच्या  भूमिकेसाठी शाहिर शेखची निवड करण्यात आली आहे. या मालिकेचं शूटिंग सुरू झालं असून सेटवरील धमालमस्तीचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र सुशांतच्या चाहत्यांना हे मुळीच रुचलेले दिसत नाही. म्हणूनच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ही मालिका सुरू होण्याआधीच बंद करण्याची मागणी उचलून धरली आहे. 

‘पवित्र रिश्ता 2’ च्या शूटिंगला सुरूवात

सोशल मीडियावर पवित्र रिश्ता 2 च्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे आणि शाहिर शेखचा फर्स्ट लुकदेखील सोशल मीडियावर पोस्ट झाला आहे. अल्ट बालाजीने या मालिकेची पहिली झलक दर्शकांसाठी प्रदर्शित केली होती. ज्यामध्ये शाहीरने अगदी जुन्या मानवप्रमाणे चेक्सचा शर्ट आणि गळ्यातील काळा ताईत घातला होता तर अंकिताने सलवार सूट परिधान केला होता. यासोबत वाहिनीने शेअर केलं होतं की, कधी कधी सामान्य जीवनात आपल्याला असाधारण प्रेमकथा पाहायला मिळतात. मानव आणि अर्चना हे एक अशाच असाधारण प्रेमकथेचं उदाहरण आहे. पवित्र रिश्ता पुन्हा येत आहे. अल्ट बालाजीवर लवकरच प्रदर्शित होणार पवित्र रिश्ता… मात्र हे फोटो आणि व्हिडिओ पाहून सुशांतचे चाहते चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत. कारण त्याच्या चाहत्यांना दुसऱ्या कुणीतरी सुशांतची जागा घेतलेली आवडलेली दिसत नाही. सुशांत सिंह राजपूतची पवित्र रिश्ता ही स्ट्रगल काळातील पहिली मालिका होती. शिवाय सुशांतला या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे मानव म्हणजे फक्त सुशांत सिंह राजपूत अशी त्याच्या चाहत्यांची धारणा झाली आहे. अशात दुसऱ्या कुणीतरी मानव साकारणे चाहत्यांना मुळीच आवडलेले दिसत नाही आहे.

सुशांतच्या चाहत्यांनी केली मालिका बंद करण्याची मागणी

सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी ‘पवित्र रिश्ता 2’ मालिका बंद करण्याची मागणी उचलून धरली आहे. ट्विटरवर #BoycottPavitraRista2 चा ट्रेंड सुरू झाला आहे. चाहते या हॅशटॅगने स्वतःच्या मनातील भावना मु्क्तपणे पोस्ट करताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी या पोस्टसोबत आमचा मानव फक्त सुशांत असंही पोस्ट केलं आहे. काहींनी शेअर केलं आहे की, “सुशांतची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला ऑनस्क्रीन बदलू शकता मात्र आमच्या डोक्यात आणि मनात कायम सुशांतच मानव असेल. आज सुशांत या जगात नाही हीच गोष्ट  आम्हाला पचवणे शक्य नाही”  अंकिता लोखंडे मात्र तिच्या मालिकेच्या नव्या सीक्वलसाठी आणि नव्या मानवसोबत खुश दिसत आहे. कारण तिने सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती स्वत:ची “और मैं अर्चना” अशी ओळख करून देताना दिसत आहे.

फोटोसौजन्य – इन्साग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

राहुल वैद्यच्या संगीतची जोरदार तयारी सुरु, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिजीत खांडकेकर मराठीतला रणवीर सिंह, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल

ADVERTISEMENT
12 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT