आजारी असूनही अमिताभ बच्चन करतायत काम, फोटो झाला व्हायरल

आजारी असूनही अमिताभ बच्चन करतायत काम, फोटो झाला व्हायरल

बीग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यांच्या प्रकृती अस्वस्थासंदर्भातील माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली. पण जास्त वेळ आजारी राहून कसे चालेल?  नेहमीच कामाला प्राधान्य देणाऱ्या अमिताभ यांनी चक्क आराम न करता पुन्हा करण्याला प्राधान्य दिले आहे. आहे त्या अवस्थेतही ते एका चित्रपटाच्या स्क्रिप्ट रिडिंगसाठी आवर्जून पोहोचले. त्यांच्या कामावरील प्रेमामुळेच सोशल मीडियावर त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहे.


रणबीर कपूर खऱ्या आयुष्यातही आहे जग्गा जासूस, कतरिनाचा खुलासा


अमिताभ यांना काम महत्वाचे


अमिताभ बच्चन बीग बी नेहमीच त्यांच्या शिस्तप्रिय कामासाठी ओळखले जातात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अमिताभ बच्चन यांनी आणखी एक नवा चित्रपट साईन केला असून या चित्रपटाच्या स्क्रिप्ड रिडिंगसाठीच अमिताभ बच्चन काल आनंद पंडित यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्या ऑफिसमधून बाहेर पडताना त्यांचा हा फोटो पापाराझींनी टिपला आहे. या फोटोमध्ये अमिताभ यांनी गळ्याला पट्टा तसाच लावलेला दिसत आहे. त्यांचा चेहरा थकलेला दिसत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा आनंद दिसत आहे. त्यामुळेच सगळ्या सोशल मीडियावर त्यांच्या कामाचची तारिफ केली जात आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The mighty Big B. Unstoppable power house yesterday at producer #anandpandit office for script reading @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
कोणता आहे चित्रपट?


मौनीचे बिकिनीतील फोटो होत आहेत व्हायरल... पाहा फोटो


हाती आलेल्या माहितीनुसार बीग बी सध्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर  त्यांच्या या नव्या फोटोनंतर त्यांनी आणखी एक चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव कळले नसले तरी या चित्रपटात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी, अनु कपूर आणि सौरभ शुक्ला यांच्या देखील भूमिका असल्याचे कळत आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट फिक्स झाली असून लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी 2020मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असे देखील कळत आहे.


'ब्रम्हास्त्र' लवकरच फ्लोअरवर

सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे ती धर्मा प्रोडक्शनच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाची. आणखी एक बीग बजेट चित्रपट घेऊन धर्मा येत आहे. नुकताच त्यांचा कलंक हा चित्रपट येऊन गेला. कलंक बॉक्सऑफिसवर आपटल्यानंतर आता या चित्रपटाचा केलेला फुगा फुटतो की, हवेत उडतो ते पाहावे लागणार आहे. या चित्रपटात आलिया भट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांच्या भूमिका आहेत. काहीच दिवसांपूर्वी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या लोगोचे अनावरण केले. या लोगोमध्येही अमिताभ यांच्या आवाजात ब्रम्हास्त्रविषयी सांगण्यात आले आहे. ब्रम्हास्त्र हा एक अॅक्शन हिरोपटातील चित्रपट असून कलंकनंतर  करणसाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट असणार आहे.


अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली.... ट्विटवरुन दिली माहिती


ठग्जनंतर आता दिसणार चित्रपटात


आमीर खानसोबत अमिताभ बच्चन ठग्ज ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसले होते. पण .या चित्रपटातील तगडी स्टार कास्टही चित्रपट तगवू शकली नाही. प्रेक्षकांनी हा नवा प्रयोग हास्यास्पद असल्याचे म्हटले. त्यामुळे हा चित्रपट आला तसा गुंडाळला.अमिताभ बच्चन यांनी या वयात अॅक्शन अवतारात पाहून अनेकांना वेगळे आणि चांगले वाटले असले तरी चित्रपटाने मात्र काहीच कमाई केली नाही.


(फोटो सौजन्य- Instagram)