डॉक्टर डॉनने घरात राहण्यासाठी केला आहे असा 'फुलप्रूफ प्लॅन'

डॉक्टर डॉनने घरात राहण्यासाठी केला आहे असा 'फुलप्रूफ प्लॅन'

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी लढत आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनावर या संकटाचा परिणाम झालेला दिसून येत आहे. हा मोठ्या प्रमाणावर व्हायरस पसरू नये म्हणून सरकारने काही ठोस निर्णय घेतले. ज्यामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  मराठी मनोरंजन सृष्टीवर सुद्धा याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व मालिकांचे शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवाय या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या बरोबरीनेच, स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ काढण्याचा निर्णय अनेक कलाकारांनी घेतलेला आहे. 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारा अभिनेता देवदत्त नागे, याने तर या काळात त्याचा एक 'फुलप्रूफ प्लॅन'च तयार केला आहे. तेव्हा जाणून घेऊ या क्वारंटाइनवर हा आहे डॉक्टर डॉनचा इलाज

देवदत्तचा हा आहे फुलप्रूफ प्लॅन

देवदत्तला बॉडीबिल्डिंगची आणि बाईक्सची खूप आवड असल्याचं सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात तो या दोन्ही गोष्टींकडे अधिक लक्ष देणार असल्याचं त्याने शेअर केलं आहे. आता तो शरीर कमावण्याबद्दलची अधिक माहिती, सोशल मीडिया आणि पुस्तकांचा पुरेपूर वापर करून मिळवणार आहे. त्यामुळे घरात बसून करायचं काय हा प्रश्नच त्याला सतावत नाही आहे. कारण त्याचं ठरलं आहे या काळात नेमकं काय काय करायचं.यासाठी तो वर्कआऊट संदर्भातील पुस्तके वाचणे, अरनॉल्ड, रॉकसारख्या जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर्सचे युट्युब व्हिडीओज पाहणे यात त्याचा संपूर्ण वेळ घालवणार आहे. सूर्यनमस्कारासारखे सर्वांगसुंदर भारतीय व्यायामप्रकार तो या दिवसांमध्ये करणार आहे. अर्थात, युट्युबचा वापर तो केवळ या विषयावरील विडिओ बघण्यासाठी करणार नसून, त्या माध्यमातून चित्रीकरण आणि एडिटिंगविषयी अधिक माहिती मिळवण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न असणार आहे. बाईक्सची खूप आवड असलेला देवदत्त ट्रॅव्हलवर आधारित युट्युब चॅनेल्स सुद्धा बघणार आहे. याशिवाय त्याच्याकडे असलेल्या बाईक्सची काळजी घेण्यासाठी तो वेळ काढणार आहे. 

सर्वात महत्त्वाचं आहे कुटुंब

करिअरच्या मागे धावता धावता प्रत्येकाला कुटुंबाला वेळ देता येतोच असं  नाही. कलाकारांची तर याबाबत नेहमीच धावपळ सुरू असते. शूटिंग आणि फॅमिली टाईम मॅनेज करणं म्हणजे त्यांच्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरतच असते. मात्र आता मिळालेला हा वेळ फक्त आणि फक्त कुटुंबासाठी आहे. म्हणूनच या काळात देवदत्त त्याच्या कुटुंबाला सुद्धा प्रथम प्राधान्य देणार आहे. कुटुंबाला त्याचा वेळ देण्याचा तो पूर्ण प्रयत्न करणार आहे. घरच्या कामामध्ये जबाबदारी उचलणे, नव्या पाककृती शिकण्याचा प्रयत्न करणे अशा इतरही अनेक गोष्टी देवदत्त यासाठी करत आहे.

कलाकार करत आहेत घरातील काम

सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे.हिंदी असो वा मराठी सर्वच कलाकारांवर घरात अडकून पडण्याची वेळ आली आहे. घरात येणाऱ्या मदतनीस, कुक, मेड बंद झाल्यामुळे आता सर्वांनाच घरातील कामे स्वतः करावी लागत आहेत. अनेक सेलिब्रेटीज त्यांचा हा क्वारंटाइन टाईम कसा घालवत आहेत हे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

सुझान खान ऋतिक रोशनच्या घरी परतली, ऋतिक झाला भावूक, शेअर केली पोस्ट

बॉलीवूडनेही केलं लॉकडाऊनचं समर्थन

सोनम कपूरकडे आहे गोड बातमी, व्हायरल होतोय फोटो