जय मल्हारफेम देवदत्त नागे आता साकारणार डॉक्टर डॉन

जय मल्हारफेम देवदत्त नागे आता साकारणार डॉक्टर डॉन

टेलिव्हिजन मालिकांवर प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम करतात. काही दिवसांपूर्वी गाजलेली पौराणिक मालिका जय मल्हारला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेत देवदत्त नागे  या अभिनेत्याने खंडेरायाची भूमिका साकारली होती. जय मल्हार मालिकेतील देवदत्तला प्रेक्षक खरोखरच खंडोबा देवाप्रमाणे आदर देत होते. जेव्हा जेव्हा देवदत्त नागे सार्वजनिक ठिकाणी जात असे तेव्हा लोक ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ या जयघोषाने त्याचे स्वागत केले जात असे. जय मल्हार फेम देवदत्त आता लवकरच एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवदत्तची ही भूमिका जय मल्हारमधील पौराणिक भूमिकेपेक्षा अतिशय वेगळी असणार आहे. 

देवदत्त साकारणार डॉक्टर डॉन

देवदत्त लवकरच 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून प्रेश्रकांच्यासमोर येणार आहे. या मालिकेचं नाव 'डॉक्टर डॉन' असलं, तरी या मालिकेचं स्वरूप मात्र विनोदी असणार आहे. पौराणिक मालिकेत खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेला देवदत्त नागे या मालिकेत थेट डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. डॉनचं आयुष्य, त्याच्या भोवतालची परिस्थिती, जवळच्या माणसांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड यावर ही मालिका आधारित असणार आहे. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. जवळजवळ दोन वर्षानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरत असलेल्या देवदत्तला, मालिकेतील त्याच्या लुकसाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यापासून या मालिकेचे शूटिंग सुरू होणार आहे. 

डॉनची भूमिका साकारणं देवदत्तसाठी असणार आव्हानात्मक

देवदत्तने जय मल्हार प्रमाणेच नुकताच प्रदर्शित झालेल्या तानाजी या चित्रपटात सुर्याजी मालुसरे ही भूमिका साकारली आहे. तानाजी मालुसरे यांच्या भावाची भूमिका देवदत्तने या चित्रपटात साकारली आहे. आता डॉक्टर डॉन या विनोदी मालिकेत डॉनचे पात्र साकारणं देवदत्तसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. देवदत्तसारखा दमदार कलाकार हे आव्हान नक्कीच पेलू शकतो. याविषयी बोलताना देवदत्तने त्याच्या भावना शेअर केल्या; "विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला विचारलं याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटा सुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं. विनोदी मालिका, हे आव्हान माझ्यासाठी खूपच छान असेल. मला डॉनच्या भूमिकेत पाहायला माझ्या चाहत्यांना सुद्धा खूपच आवडेल यात काहीच शंका नाही. ही नवी मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री वाटते. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसंच याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी माझी इच्छा आहे." 

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

जान्हवी कपूरला नाही व्हायचं आई श्रीदेवीसारखं सुपरस्टार

कपिलच्या अनायरावर सेलिब्स झाले फिदा, फोटो झालेत व्हायरल

मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज