देवेन भोजानी ‘भाकरवडी’तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

देवेन भोजानी ‘भाकरवडी’तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

भाकरवडी हा खाद्यपदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे. पण भाकरवडीप्रमाणेच खुशखुशीत विनोद करून सर्वांना पोट धरुन हसायला लावणारी एक विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे नाव भाकरवडी असून या मालिकेतून देवेन भोजानी आणि परेश गनात्रा हे दोन विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे देवेन भोजानी बऱ्याच वर्षांनी या मालिकेतून पुन्हा टेलीव्हिजनवर कमबॅक करत आहे.

भाकरवडीच्या माध्यमातून घरोघरी पोहचणार एक खुशखुशीत 'कॉमेडी ड्रामा'


 


‘भाकरवडी’ हा पदार्थ मराठी आणि गुजराती दोन्ही खाद्यसंस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहे. त्या मालिकेत भाकरवडीचा व्यवसाय करणाऱ्या मराठी आणि गुजराती कुटूंबातील स्पर्धा रंगणार आहे.ही दोन्ही कुटूंब एकाच परिसरामध्ये भाकरवडीचा व्यवसाय करत असतात. सहाजिकच त्यामुळे त्यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरू होते. मालिकेला अधिक इंटरेस्टिंग करण्यासाठी या कुटूंबातील मुलांचं एकमेकांवर प्रेम असल्याचंदेखील दाखविण्यात येणार आहे. कुटूंबप्रमुख एकमेकांचे शत्रू तर त्यांच्याच मुलगा आणि मुलीचे असलेले प्रेमसबंध यामुळे या मालिकेत विनोदाची खास मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.भाकरवडीतील तिखड-गोड चवीप्रमाणे या मालिकेमध्ये विनोदाचे अनेक रंग दिसणार आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखांना विविध छटा असल्यामुळे प्रेक्षकांना त्या नक्कीच आवडतील. शिवाय मराठी आणि गुजराती कुटूंबावर आधारित ही मालिका असल्यामुळे त्यातून सहज विनोदाचे तुषार उडतील यात शंकाच नाही.

देवेन भोजानीचा नवा ‘विनोदी रंग’


देवेन भोजानीने अनेक विनोदी मालिकांमधून काम केले आहे. भारतीय टेलीव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देवेन भोजानी सर्वोत्तम विनोदी कलाकार आहे. अनेक विनोदी मालिकांमधील कामांसाठी अनेक पूरस्कार मिळाले आहेत. सत्तरच्या काळातील देख भाई देख मालिकेपासून ते अगदी काही वर्षांपूर्वी गाजलेल्या बा बहू और बेबे, साराभाई vs साराभाई अशा अनेक मालिकांमधून देवेन भोजानीने प्रेक्षकांना खदखदून हसवलं आहे. अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमधूनही देवेनने विनोदी भूमिका साकारल्या आहेत.देवेन एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. विविध मालिका आणि चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. मात्र गेल्या वर्षांपासून देवेन कोणत्याही मालिकेमध्ये अभिनय करताना दिसला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याने पुन्हा एखादी विनोदी भूमिका साकारावी असं वाटत होतं. त्यामुळे आता भाकरवडी या मालिकेमधून तो त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा हसविण्यासाठी येत आहे. सहाजिकच त्यामुळे या मालिकेबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाकरवडी ही मालिका सोनी सब टिव्ही वर 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 


bhakhaewadi


सुबोध भावे–भार्गवी चिरमुले यांचे ‘काही क्षण प्रेमाचे’


 


फोटोसौजन - इन्स्टाग्राम