अचानक ट्रेंडिंगमध्ये आलेली धनश्री वर्मा कोण आहे, लवकरच होणार क्रिकेटरची बायको

अचानक ट्रेंडिंगमध्ये आलेली धनश्री वर्मा कोण आहे, लवकरच होणार क्रिकेटरची बायको

एक दोन दिवसांपासून अचानक ट्रेंडिंगमध्ये आलेली धनश्री वर्मा कोण आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना आता पडला असेल. धनश्री वर्मा ही प्रसिद्ध युट्यूबर असून कोरिओग्राफरही आहे.  पण ती ट्रेंडिंगमध्ये आली ती भारताचा अव्वल गोलंदाज युझवेंद्र चहलशी केलेल्या रोकामुळे. गेले काही महिने हे दोघेही सतत इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. पण धनश्रीने दोन आठवड्यांपूर्वीच युझवेंद्रच्या वाढदिवसाच्या दिवशी युझवेंद्रचा एक डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर सर्वांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि शनिवारी हे सिद्धही झालं. घरच्या घरी युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा रोका पार पाडल्याचा फोटो व्हायरल झाले. पण बऱ्याच जणांना धनश्री नक्की कोण आहे आणि काय करते हे माहीत नव्हतं.  तर आता या दोन दिवसात धनश्रीच्या फोलोअर्समध्येही बरीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 

मौनी रॉयचा साखरपुडा, फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत

धनश्रीच्या चॅनेलचे 1.5 मिलियन सबस्क्रायबर

धनश्री ही प्रसिद्ध युट्यूबर असून तिच्या चॅनेलचे 1.5 मिलियन सबस्क्रायबर आहेत.  इतकंच नाही तर धनश्री एक उत्कृष्ट कोरिओग्राफरही आहे. आपल्या एक्सप्रेशन्स आणि नृत्यासाठी धनश्री प्रसिद्ध असून तिला आधीपासूनच सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर अनेक नृत्यदिग्दर्शकही तिला फॉलो करतात. धनश्रीचं वय केवळ 24 असून तिने लहान वयातच प्रसिद्धी मिळवली आहे. तसंच अपारशक्ती खुराणा,  प्रियांक शर्मा, आस्था गिल, गुरू रंधावा, कार्तिक आर्यन, सारा अली खान यासारख्या कलाकारांबरोबर तिचे डान्स व्हिडिओजदेखील आहेत. धनश्री वर्मा नावाची तिची स्वतःची डान्स कंपनी असून ती डान्स शिकविण्याचं कामही करते. धनश्रीच्या सोशल मीडियावर सर्वच डान्स व्हिडिओ असून तिचे डान्सबद्दलचे प्रेम दिसून येते. 

बाहुबलीतील भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत, फोटो झाले वायरल

चहलने शनिवारी केली घोषणा

युझवेंद्रने धनश्रीबरोबरचा फोटो पोस्ट करत दोघांनीही दोन्ही कुटुंबाच्या संमतीने होकार दिल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांवरही बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. काही  दिवसांपूर्वीच धनश्रीने त्याचा व्हिडिओ शेअर करत ज्या व्यक्तीने तुला डान्स शिकवला आहे त्याने तुझा विकेट घेतली आहे आशयाची कॅप्शन लिहिली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याबद्दल चर्चेला सुरूवात झाली होती. मात्र हे दोघे एकमेकांना कधी भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात कसे पडले याची माहिती नसली तरीही त्यांच्या चाहत्यांना हे जाणून घेण्याची नक्की उत्सुकता आहे. धनश्री तिचे अनेक डान्स व्हिडिओ  पोस्ट करत असून तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. तिच्या केसांची बऱ्याच व्हिडिओमध्येही अनेकांनी प्रशंसा केल्याचे दिसून आले आहे. धनश्रीचे केस अतिशय लांब असून ती जितका सुंदर डान्स करते तितकीच सुंदर दिसते. दरम्यान लवकर युझवेंद्र चहल युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी रवाना होणार असून रॉयल चॅलेंजर्सकडून खेळणार आहे. 53 दिवसांची ही टूर्नामेंट 19 सप्टेंबर रोजी सुरू होणार असून 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. 30 वर्षीय चहलने आतापर्यंत 52 एकदिवसीय सामने खेळले असून 42 टी20 सामने भारतासाठी खेळले आहेत. उत्तम गोलंदाज म्हणून खूपच कमी वेळात युझवेंद्रने भारतामध्ये नाव कमावलं आहे. आता आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगसाठीही युझवेंद्र धनश्रीसह तयार झाला आहे. 

नच बलिए 10 ची परिक्षक असणार बिपाशा बासू, या दोन सेलिब्रेटीजच्या नावाचीही चर्चा

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा