जेव्हा दिलीपकुमार यांच्या कौतुकाने भावुक झाले होते धर्मेंद्र

जेव्हा दिलीपकुमार यांच्या कौतुकाने भावुक झाले होते धर्मेंद्र


दिग्गज अभिनेता धर्मेंद्र बॉलीवूडचे जेष्ठ कलाकार आहेत. जुन्या जमान्यातील अभिनेते असूनही  सोशल मीडियावर आजही त्यांचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. सध्या धर्मेंद्र चित्रपटांमध्ये काम करत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामधून धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या व्हिडिओला धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. पाहा या व्हिडिओत काय आहे असं...

स्वतःचे कौतुक ऐकून भावूक झाले धर्मेंद्र

अभिनेता धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जुन्या आठवणी जागवणारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून एक असाच थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओ मध्ये त्यांच्यासोबत अभिनेते दिलीप कुमार देखील आहेत. हा व्हिडिओ एका जुन्या फिल्मफेअर पुरस्काराचा असून त्यात धर्मेंद्र यांनी दिपीप कुमार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारलेला आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यावेळी अभिनेत्री आणि त्यांची  पत्नी सायरा बानोदेखील दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिलीप कुमार यांनी धर्मेंद्र यांची खूपच प्रसंशा केलेली आहे. त्यातून अभिनयाव्यतिरिक्त धर्मेंद्र यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे त्यांनी प्रकर्षाने सांगितले आहे. स्वतःचे असे तोंडभरून केलेल कौतुक ऐकून त्यावेळी धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांना आदराने वाकून नमस्कार केलेला होता. हा जुना व्हिडिओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी एक सुंदर कॅप्शनदेखील शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलं आहे की, " फिल्म इंडस्ट्रीच्या देवाकडून मिळालेली कौतुकाची थाप" सोशल मीडियावर धर्मंद्र यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडत आहे. धर्मेंद्र चाहत्यांकडून होणाऱ्या या कौतुकामुळे फारच भावुक झाले आहेत. 

धर्मेद्र आणि दिलीप कुमार सुपरहिट जोडी

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार हे एकेकाळचे दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या सक्षम अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रर काम केले आहे. परी आणि अनोखा मिलन या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आहे. या दोघांची जोडी त्या काळची सुपरहिट जोडी होती. कोरोनाच्या काळात अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकजण  आहेत त्या ठिकाणी अडकून पडले होते. धर्मेंद्र देखील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये अडकले आहेत. पण त्यांचा प्रत्येक क्षण ते तेथे मजेत घालवत आहेत. त्यांना शेतीची आवड असल्यामुळे ते फार्म हाऊसवर शेती करण्यात वेळ घालवत आहेत. शेतात पिकवलेल्या भाजी आणि इतर गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ ते नेहमीच शेअर करत असतात. धर्मेंद्र यांचं आता वय झालं असल्यामुळे जुन्या फोटोंमधून भूतकाळातील आठवणींमध्ये ते असे रमत आहेत. 

तुमच्या आवडत्या दिग्गज आणि जुन्या कलाकाराचे नाव आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

अधिक वाचा -

बॉलीवूड सेलिब्रेटीज जे आहेत अजूनही अविवाहित

शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा

संगीतकार विशाल शेखरला टक्कर देतोय रितेश देशमुखचा मुलगा