तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आता शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. अनेक चित्रपट, मालिका यांच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. मालिकांचे नवे भागही आता दाखवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मनोरंजन विश्व पुन्हा एकदा आपले पाय रोवू लागले आहे. अनेक नियमांचे पालन करत या शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला असला तरी सुद्धा काही कलाकारांना अद्याप काम करण्याची संधी देण्यात आली आहे. हे कलाकार म्हणजे ज्येष्ठ नागरिक कलाकार… त्यांच्यासाठीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र धावून आले आहेत. त्यांनी ज्येष्ठ कलाकारांनाही कामाची संधी द्या असे सांगितले आहे.
अभिनेत्री राजश्री ठाकूरचा कमबॅक, तब्बल पाच वर्षांनी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर
नेमकं काय म्हणाले धर्मेंद्र ?
धर्मेंद्र यांनी ज्येष्ठ कलाकारांची बाजू घेतली आहे ते म्हणाले की, मी 65 वर्षांचा आहे. मला शूटिंग आणि काम करायला फार आवडते. सध्याच्या माझा वेळ मी शेती करण्यात घालवत आहे. माझे मन इथे चांगले रमते. पण माझ्या वयाचे काही असे कलाकार आहेत ज्यांना शूटिंगच्या कामाची अत्यंत गरज आहे. पैसा कमावणे त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे. सध्याच्या कोव्हिड 19मुळे ज्येष्ठ नागरिकांना काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे अनेकांच्या कमाईचे साधन नष्ट झाले आहे. सरकारने या कलाकारांचा विचार करुन त्यांना कामाची संधी द्यायला हवी. सगळ्या नियमांचे आणि गाईडलाईनचे पालन करुन त्यांनाही सेटवर जाण्याची संधी द्यायला हवी. म्हणजे त्यांचे काम थांबणार नाही आणि त्यांना कोणताही ताण येणार नाही. प्रत्येक कलाकारासाठी त्याचे काम हीच पूजा असते. तिच त्याची साधना असते. त्यामुळे त्यापासून त्याला दूर ठेवणे उचित नाही.
सध्या ज्येष्ठ नागरिकांना सेटवर येण्यास मनाई
अनेक कौंटुबिक मालिकांमध्ये आजोबा आजींची भूमिका साकाणारे सिनिअर सिटीझन आहेत. कोव्हिडचा अधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असल्यामुळे त्यांना सेटवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कमाईवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम हे फारच महत्वाचे आहे. सरकारने काळजी म्हणून ज्येष्ठ नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. पण या संदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.यासंदर्भात निकाल लागण्याची आज शक्यता आहे.
शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा
सध्या धर्मेंद्र काय करत आहेत?
कोरोनाच्या काळामध्ये अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांना त्यांच्या घरी परतता आले नाही. धर्मेंद्र देखील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये अडकले आहेत. पण त्यांचा प्रत्येक क्षण ते तेथे मजेत घालवत आहेत. त्यांना शेतीची आवड असल्यामुळे ते फार्म हाऊसवर शेती करण्यात वेळ घालवत आहे असेही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
बॉलीवूड कलाकार जे रिअल लाईफमध्येही आहेत ‘बेस्ट फ्रेंड’
बॉबी देओलची नवी सिरिज लवकरच
धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल चित्रपटांपासून काही काळ दूर गेला होता. पण त्याने हाऊसफुल 4 या चित्रपटापासून पुन्हा एकदा कमबॅक केले. आता पुन्हा एकदा बॉबी देओलला काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘आश्रम’ या वेबसिरिजमध्ये तो दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही वेबसिरिज रिलीज होणार आहे.
आता धर्मेंद्र यांच्या मागणीनुसार आता ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची संधी पुन्हा कधी मिळते त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.