‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची लोकप्रियता

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची लोकप्रियता

बॉलीवूडचा नवा अ‍ॅक्‍शन हिरो आदित्य रॉय कपूर आणि बॉलीवूडची सध्याची सर्वाधिक सेक्सी अभिनेत्री दिशा पटानीची ‘मलंग’ केमिस्ट्री यंगस्टर्सना खूप पसंत पडलीय. ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. दोघांची वाढती लोकप्रियता पाहता स्कोर ट्रेंड्स इंडिया न्यूजप्रिंट लीडरशीपमध्ये आदित्य आणि दिशाच्या रँकिंगमध्ये खूप फरक पडलेला आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. या आकडेवारीनुसार मलंगचा प्रोमो येण्याअगोदर आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची रँकिंग अनुक्रमे 21 (23 जानेवारी) आणि 15 (23 जानेवारी) अशी होती. चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि प्रोमो आल्यानंतर एका आठवड्यातच या दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीविषयीच्या चर्चा रंगल्या. खासकरून युवा वर्गात यांची लोकप्रियता एवढी वाढली की, दोघंही लोकप्रियतेची शिखरं पादाक्रांत करत गेले. आदित्य 21 वरून थेट 11 व्या क्रमांकावर पोहोचला तर दिशा 15 व्या क्रमांकावरून पहिल्या 5 नंबरांमध्ये (30 जानेवारी) पोहोचली.

रिलीजवेळी आणि रिलीजच्यानंतर

चित्रपटाच्या रिलीजवेळी आणि रिलीजच्यानंतर आदित्य आणि दिशा दोघांविषयी देशभरातल्या सर्व न्यूज मीडियामध्ये बातम्या झळकल्या. 13 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आदित्य 11 व्या स्थानावरून पाचव्या स्थानी तर दिशा पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचलीय.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "आदित्य आणि दिशा युवावर्गात खूप लोकप्रिय आहेत. मलंग सिनेमामुळे तर दोघांच्याही लोकप्रियतेत चांगलाच फरक पडलेला दिसून आला. दोघांचीही सुडौल शरीरयष्टी युवावर्गाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. युवासुद्धा त्यांचे अनुकरण करताना दिसत आहेत. तसंच मलंग सिनेमावेळी आदित्य-दिशाविषयीची अनेक आर्टिकल्स वृत्तपत्रात छापून आली. त्यामुळेही या दोघांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.“

अश्वनी कौल पुढे सांगतात की, "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजीटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.