समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल

समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या हॉट फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर बिकिनीतील अतिशय मादक फोटो शेअर केला. समुद्रकिनाऱ्यावर काढलेला तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. दिशा पटानी या फोटोमध्ये वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. दिशाच्या चाहत्यांनी या फोटोवर अक्षरशः लाइक्सचा पाऊस पाडला आहे.  दिशा पटानीचा (Disha Patani) हा बीच लुक (Beach Look) आगामी सिनेमा ‘मलंग’मधील असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच ‘मलंग’ सिनेमातील ‘काफिरा’ गाणं रिलीज झालं. ‘मलंग’चा ट्रेलर रिलीजनंतर सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या 'काफिरा' गाण्यानं सिनेरसिकांची मने जिंकली आहेत.

(वाचा : शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न)

View this post on Instagram

#malang🧜🏻‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

'मलंग' सिनेमात दिशा पटानी- आदित्य रॉय कपूरची जोडी

दिशा पटानीचा (Disha Patani) 'मलंग' (Malangg) 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांच्या मुख्य भूमिका आहेत.  या सिनेमाव्यतिरिक्त दिशा पटानी लवकरच 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड' हीरोमध्येही दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिशा पटानी आणि सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

हॉट फोटोंवर वडिलांची काय असते प्रतिक्रिया?

दिशा पटानीच्या फोटोंवर तिच्या वडिलांची नेमकी प्रतिक्रिया काय असते, याचीही चर्चा बऱ्याचदा सुरू असते. दिशा बऱ्याचदा हॉट लुकमधीलच फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा तिच्या फोटोंना ट्रोलही केलं जातं. पण दिशाचे हे मादक फोटो तिच्या वडिलांना अजिबात आवडत नाहीत. स्वतः दिशानेच एका मुलाखतीदरम्यान ही बाब सांगितली. दिशाने सांगितलं की, ‘मी एखादं फोटोशुट केल्यानंतर सर्वात आधी माझ्या कुटुंबीयांसोबत फोटो शेअर करते. पण हे फोटो पाहताना माझे वडील थोडेसे अस्वस्थ होतात.’

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

 

धोनी गर्लचा हा प्रवास

‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. या सिनेमातील तिचा सोज्वळ लुक प्रेक्षकांना अतिशय भावला. सिनेमात तिनं महेंद्रसिंह धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर 'बाघी-2' , 'कुंफू योगा', 'भारत' या चित्रपटांमध्ये दिशानं काम केलं. आतापर्यंत केलेल्या तिच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली.

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

'मलंग'साठी अमृतानं 12 किलो वजन केलं कमी

'मलंग' सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील दिसणार आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल 12 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी तिनं व्यायाम आणि आहारात विशेष बदल केले आहेत. वजन घटवण्यासाठी तिनं विशेषतः डेअरी प्रॉडक्ट आणि साखर पूर्णतः बंद केली.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.