दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत गेली होती डेटवर

 दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत गेली होती डेटवर

बी टाऊनमध्ये कोणीही कोणासोबत दिसले तरीही चर्चा होते. म्हणजे सध्या सगळ्या पापाराझींची नजर अर्जुन आणि मलायका अरोरावर असते. पण या पापाराझींचे लक्ष विचलित करण्यासारखी एक गोष्ट घडली आहे. एरव्ही टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा पटानी काल मुंबईतील वांद्रे परीसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरेसोबत दिसली. मग काय त्या दोघांना पाहून पापाराझींच्या भुवयाही उंचावल्या. त्यामुळे दिशा पटानी आदित्य ठाकरेसोबत काय करत होती ही चर्चा रंगू लागली आहे.


अंबानी वेडिंग्जमध्ये सेलिब्रिटींचा अनोखा अंदाज, पाहा फोटो

एक लडका और लडकी दोस्त नही हो सकते क्या?


 पापाराझींनी त्यांचे फोटो शेअर केल्यानंतर दिशा पटानीच्या फॅन्सनी लगेचच दिशाची बाजू घेतली आहे. बाजू घेत एक लडका और लडकी दोस्त नही हो सकते क्या ? असे प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे नक्कीच त्यांची ही भेट डेट नव्हती यावर नेटीझन्सनी शिक्का लावला आहे. पापाराझींनी त्यांना एका रेस्टॉरंटच्या बाहेर येताना क्लिक केले आहे. दिशा पटानी आदित्यसोबत इतकी कम्फर्टेबल होती की, ठाकरे घराण्याशी तिचे चांगले संबंध असावे याचा अंदाज येतो. तिच्या या फोटो आणि व्हिडिओजमध्ये ती आदित्यसोबतच गाडीतून जाताना दिसत आहे. आता त्यांची ही भेट कोणत्या प्रोजेक्टसाठी होती की सहज होती हे अद्याप कळालेले नाही. पण लवकरच याचा खुलासा होईल अशी अपेक्षा करुया.


दिलीप कुमार यांची नात अडकली विवाहबंधनात

टायगरसोबत होती अंबानी वेडिंग्जमध्ये


सध्या मुंबईत धूम सुरु आहे ती अंबानी वेडिंग्जची. शनिवारी आकाश अंबानीचे लग्न झाले. या लग्नात दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकत्र दिसले होते. या लग्नाला ठाकरे परीवारदेखील उपस्थित होते. उद्धव आणि आदित्य या लग्नासाठी संध्याकाळी आले होते. याशिवाय या लग्नासाठी अर्जुन आणि मलायका एकत्र येणार असे वाटले होते. पण या दोघांनी एकत्र येणे टाळले. या शिवाय अंबानी वेडिंग्जमध्ये दुपारपासून सेलिब्रिटींची रेलचेल पाहायला मिळाली. रविवारी झालेल्या पोस्ट वेडिंग पार्टीसाठीही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Couple Cool @tigerjackieshroff @dishapatani


A post shared by Manav Manglani (@manav.manglani) onभारतमध्ये दिसणार दिशा 


२०१८ साली दिशा टायगरसोबत 'बागी २' मध्ये दिसली होती आणि आता २०१९ मध्ये ती सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय २०२०मध्ये ती मलंग या चित्रपटात दिसणार असल्याचे देखील कळत आहे. पण अद्याप मलंगसंदर्भात कोणतीच अधिक माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता तिच्या फॅन्सना  तिला पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.


disha patani


पहिल्यांदाच कार्यक्रमात दिसली सोनाली बेंद्रे


ठाकरे घराणे कलाकारांशी नेहमीच जोडलेले


आदित्य ठाकरे आता दिशा पटानीसोबत दिसले असले आणि त्याची चर्चा होत असली तरी ठाकरे घराण्याचे  कलाकारांनी जवळचे संबंध आहेत. हे आपण आधीही पाहिले असेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची कलाकारांशी नेहमीच जवळीक राहिली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी वगळता  हॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे बाळ ठाकरे चाहते होते. नव्वदीच्या दशकात मायकल जॅक्सनची क्रेझ होती. मायकल जॅक्सन खास भारतात बाळ ठाकरे यांच्यासाठी आला होता. या शिवाय बच्चन कुटुंबीय,अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर  आणि अन्य मराठी कलाकारांशी चांगले संबंध आहेत.


michel jackson


(फोटो सौजन्य- Instagram)