ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

परी म्हणू की सुंदरा ! ‘मलंग गर्ल’ दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)सध्या ‘मलंग’ या आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘मलंग’ सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यानं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. 7 फेब्रुवारी 2020ला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाच्या प्रत्येक गाण्यामध्ये दिशा पटानी वेगळ्याच अंदाजात आणि हटके स्टाईलमध्ये दिसत आहे. ग्लॅमरस दिशा पटानी या सिनेमामध्ये आदित्य रॉय कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण दिशा पटानीनं इन्स्टाग्रामवर ‘मलंग’ व्यतिरिक्तही धुमाकूळ घातला आहे. दिशानं आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. दिशा पटानी (Disha Patani) ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले लेटेस्ट फोटोशूटमध्ये पर्पल ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

(वाचा : समंदर में नहाकर…, दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

समंदर में नहाकर…, दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियावर बिकिनीतील अतिशय मादक फोटो शेअर केला हता. समुद्रकिनाऱ्यावर काढलेला तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. दिशा पटानी या फोटोमध्ये वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. दिशा पटानीचा (Disha Patani) हा बीच लुक (Beach Look) आगामी सिनेमा ‘मलंग’मधील आहे. नुकतंच ‘मलंग’ सिनेमातील ‘काफिरा’ गाणं रिलीज झालं. ‘मलंग’चा ट्रेलर रिलीजनंतर सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या ‘काफिरा’ गाण्यानं सिनेरसिकांची मने जिंकली आहेत.

(वाचा : पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट)

ADVERTISEMENT

‘मलंग’ सिनेमात दिशा पटानी- आदित्य रॉय कपूरची जोडी

दिशा पटानीचा (Disha Patani) ‘मलंग’ (Malangg) 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांच्या मुख्य भूमिका आहेत.  या सिनेमाव्यतिरिक्त दिशा पटानी लवकरच ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड’ हीरोमध्येही दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिशा पटानी आणि सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन ‘गंगूबाई काठियावाडी’, आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

हॉट फोटोंवर वडिलांची काय असते प्रतिक्रिया?

दिशा पटानीच्या फोटोंवर तिच्या वडिलांची नेमकी प्रतिक्रिया काय असते, याचीही चर्चा बऱ्याचदा सुरू असते. दिशा बऱ्याचदा हॉट लुकमधीलच फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा तिच्या फोटोंना ट्रोलही केलं जातं. पण दिशाचे हे मादक फोटो तिच्या वडिलांना अजिबात आवडत नाहीत. स्वतः दिशानेच एका मुलाखतीदरम्यान ही बाब सांगितली. दिशाने सांगितलं की, ‘मी एखादं फोटोशुट केल्यानंतर सर्वात आधी माझ्या कुटुंबीयांसोबत फोटो शेअर करते. पण हे फोटो पाहताना माझे वडील थोडेसे अस्वस्थ होतात.’

धोनी गर्लचा हा प्रवास

‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. या सिनेमातील तिचा सोज्वळ लुक प्रेक्षकांना अतिशय भावला. सिनेमात तिनं महेंद्रसिंह धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ‘बाघी-2’ , ‘कुंफू योगा’, ‘भारत’ या चित्रपटांमध्ये दिशानं काम केलं. आतापर्यंत केलेल्या तिच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली.

ADVERTISEMENT

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

22 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT