2020 मध्ये ट्विटरवर या अभिनेत्रींचं वर्चस्व

2020 मध्ये ट्विटरवर या अभिनेत्रींचं वर्चस्व

2020 च्या सुरूवात जोरदार झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच बॉलीवूडच्या तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियानूसार, गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरवर दिशा पटनी, प्रियांका चोप्रा जोनस आणि दीपिका पदुकोणचे वर्चस्व असलेलं दिसून येत आहे. पण या तिघींपैकी सर्वात पुढे कोण आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायचंय का मग वाचा.

दिशा ठरली सीनियर्सवर वरचढ

View this post on Instagram

🌼

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, आगामी मलंग या सिनेमात झळकणाऱ्या दिशा पटनी या अभिनेत्रीचं सध्या ट्विटरवर वर्चस्व आहे. सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या या अभिनेत्रीने लोकप्रियतेमध्ये बॉलीवूडमध्ये तिच्याहून सीनियर असलेल्या प्रियांका चोप्रा जोनास आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

दिशा गाजवणार 2020

View this post on Instagram

🌹🍎 #MYCALVINS #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या मलंग सिनेमाचा फर्स्ट लूक येताच युवावर्गाला तिने स्वतःकडे आकर्षित करून घेतलं आहे. 2020 च्या सुरूवातीलाच ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय बनलेल्या या अभिनेत्रीच्या आकर्षक शरीरयष्टीमुळेही दिशा युथमध्ये सध्या चांगलीच प्रसिध्द आहे. लोकप्रियतेत पहिल्यांदाच दिशाने प्रियांका आणि दीपिकाला टक्कर देत 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये नंबर वन स्थान पटकावलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

दूस-या स्थानी असलेली ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनस तर सध्या जगप्रसिध्द असल्याने जगभरातून तिला ट्विटरवर फॅनफॉलोइंग लाभलेली आहे. त्यामुळेच 98 गुणांसह प्रियंका चोप्रा जोनस ट्विटरवर लोकप्रिय असलेली दूसरी अभिनेत्री बनली आहे.

View this post on Instagram

💋#chhapaakpromotions

A post shared by Malti (@deepikapadukone) on

सामाजिक संदेश देणाऱ्या छप्पाक चित्रपटामुळे दीपिका गेले काही दिवस ट्विटरवर चर्चेत दिसून येत होती. 84 गुणांसह दीपिकाने लोकप्रियतेत तिसरं स्थान पटकावलं आहे.

स्कोर ट्रेंडसचे सह-संस्थापक अश्वनी कौल याबाबत सांगतात की, “ युवावर्गात अभिनेत्री दिशा पटनीची सध्या चांगलीच लोकप्रियता आहे. ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टवर तरूण वर्गाची प्रतिक्रिया आणि पेजवरची इंगेजमेंट पाहून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. प्रियांका चोप्राच्या ट्विटर पेजवर ग्लोबली इंगेजमेंट दिसून आली आहे. प्रियांका-निकच्या फोटोवर त्यांच्या चाहत्यांची सर्वात जास्त इंगेजमेंट दिसून आली आहे. छप्पाक चित्रपटाचं प्रमोशन, जेएनयुच्या मीटिंगला दीपिकाची उपस्थिती आणि छप्पाकमध्ये दिसलेला दीपिकाचा चांगला परफॉर्मन्स या सर्वाचा एकत्रित परिणाम तिच्या ट्विटर पेजवरची इंगेजमेंट वाढण्यात दिसून आलाय.“

कसं ठरवलं जातं हे रेटींग याबद्दल विचारलं असता ते सांगतात की, "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजीटल प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग ठरवतो.”

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.