दिशा! टायगर अभी जिंदा है,आदित्य- दिशाला एकत्र पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

दिशा! टायगर अभी जिंदा है,आदित्य- दिशाला एकत्र पाहून लोकांनी  दिल्या प्रतिक्रिया

टायगर श्रॉफसोबत कायम दिसणारी दिशा पटनी हल्ली मात्र  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याच्यासोबत पाहायला मिळत आहे. पापाराझींनी या दोघांना या आधीही एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना टिपले आहे आणि आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया त्यांच्या फॅन्समधून उमटताना दिसत आहे.  लोकांनी तर दिशाला टायगर अभी जिंदा है…. असा टोमणा दिला आहे. त्यामुळे सध्या दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोवरुन उलटसुलट चर्चाही सध्या रंगताना दिसत आहे. 


अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटीलचा रोल साकारणार जॅकलिन फर्नांडिस


आता गेले डिनरला


disha aditya


अगदी काही महिन्यांपूर्वी जेव्हा दिशा आणि आदित्य एकत्र दिसले होते. त्यावेळीच त्यांच्या या भेटीची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी ते लंचला गेल्याची माहिती होती आणि आता या दोघांनाही डिनरहून परतताना पापाराझींनी क्लिक केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांची चर्चा रंगू लागली आहे. आदित्य आणि दिशाला एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर असे काही व्हायरल झाले की,या फोटोवर चर्चा रंगू लागली. पाहा त्यांचे हे व्हायरल झालेले फोटो


अगं दिशा! टायगर अभी जिंदा हैtiger disha


आता तुम्हाला या टोमण्याचा अर्थ नक्कीच कळला असेल. दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ हे रिलेशनशीपमध्ये आहेत हे अनेकांना माहीत आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी ही टायगर आणि दिशा देखील डिनरसाठी एकत्र दिसली होती. पण आता टायगर नाही तर आदित्य ठाकरेसोबत गेल्यानंतर चर्चा तर होणारच ना! या फोटोखाली अनेकांनी दिशासाठी कमेंट केलेल्या आहेत.ज्यामुळेच दिशा अधिक चर्चेत आली आहे.


म्हणून एकता कपूर शेअर करत नाही तिच्या मुलाचे फोटो, वाचा कारण


आदित्य- दिशामध्ये चाललयं तरी काय?


सोशल मीडियावर आदित्य आणि दिशाच्या डिनरची कितीही वायफळ चर्चा रंगली तरी या दोघांचा एकमेकांना भेटण्याचा काहीतरी हेतू नक्कीच असणार. टायगरसोबत असलेले दिशाचे रिलेशनशीप हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे आाता आदित्य आणि दिशा कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आहेत ते पाहावे लागणार आहे. त्यांच्या या प्रोजेक्टविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नसली तरी देखील ते कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी ते कदाचित भेटत असावे असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या वायफळ चर्चा करणाऱ्यांना खरे समजल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहावे लागेल. त्यानंतर आपल्याला खरे काय ते कळेल.


दिशा पटनीचा भारत झाला रिलीज


धोनी गर्ल दिशा सध्या सलमान खानच्या भारत या चित्रपटात आहे. या चित्रपटात तिचा रोल फार मोठा नसला तरी यात तिच्यावर slow motion हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटातील तिच्या लुकची आणि डान्सची चांगलीच चर्चा रंगली. या रोलमुळे दिशाला एक वेगळी ओळख मिळणार आहे हे नक्की!


संतोष जुवेकर साकारणार आहे अँग्री यंग मॅन


(सौजन्य - Instagram)