आगामी 'भारत' चित्रपटासाठी दिशा करतेय खतरनाक स्टंट्स

आगामी 'भारत' चित्रपटासाठी दिशा करतेय खतरनाक स्टंट्स

अभिनेत्री दिशा पटनी ही तिच्या लुक्स आणि फॅशन सेन्समुळे तरूणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे आणि आतातर तिच्या चाहत्यांमध्ये अजून भर पडण्याची शक्यता आहे. कारण तेवढ्यापुरतीच आपली लोकप्रियता मर्यादित न ठेवता अभिनेत्रीही म्हणूनही स्वत़ःला सिद्ध करण्यासाठी ती मेहनत घेत्येय. 


भारतमध्ये दिसणार दिशाचा खतरनाक अंदाज


दिशा पटनी दबंग सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटात खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे. एवढंच नाहीतर या चित्रपटात तिने स्टंट्ससाठी बॉडी डबल वापरण्यास नकार दिला आहे. या चित्रपटासाठी ती सध्या कसून सराव करत आहे. तिच्या खडतर ट्रेनिंग सेशनचे खास व्हीडिओही तिने इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Trying combinations🌸 @rakeshyadav13


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on
या चित्रपटात ती दबंग खानच्या बहीणीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पण भूमिका कोणतीही असली तरी दिशा मात्र ती जास्तीत जास्त चांगली व्हावी याकरता कठोर परिश्रम करताना दिसत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Everyday makes a difference, chilling with @rakeshyadav13 😊


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on
अल्पावधीतच गाठलं लोकप्रियतेचं शिखर


दिशाने 2015 साली ‘लोफर’या तेलगू चित्रपटाने आपल्या करियरला सुरूवात केली. बॉलीवूडमध्ये तिने सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या ‘धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील तिची छोटीशी भूमिकाही भाव खाऊन गेली.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#throwback to my first step ❤️ #priyanka will always be special to me🤗❤️


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on
त्यानंतर टायगर श्रॉफबरोबर आलेल्या ‘बागी 2’ चित्रपटाने तिने अभिनेत्री म्हणून स्थान मिळवलं.

तसंच तिने 'कूंगफू योगा' नावाचा चायनीज चित्रपटातही भूमिका केली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The best man i’ve ever met, love you taaguu ❤️ #fangirl


A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on
अशाप्रकारे दिशाने अगदी मोजक्या चित्रपटात झळकत बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.


  
‘भारत’ येतोय पुढच्या वर्षी


अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट पुढच्या वर्षी 5 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात दबंग सलमान, कतरिना कैफ, तब्बू, आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच नोरा फतेहीसुद्धा खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटींग अबू धाबी, स्पेन, माल्टा, पंजाब आणि दिल्ली येथे करण्यात आलं आहे.