‘दयाबेन’च्या कमबॅकमुळे गोकुळधाममध्ये आनंदोत्सव

‘दयाबेन’च्या कमबॅकमुळे गोकुळधाममध्ये आनंदोत्सव

तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेने टेलिव्हिजन माध्यमात स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अभिनेत्री दिशा वकानी साकारत असलेली दयाबेन प्रत्येक घरातील महिलांना आपल्या शेजारी राहणारीच वाटत होती. नवरात्रीत तिचा गरबा  पाहण्यात एक वेगळीच मौज होती. मात्र अचानक दयाबेन मालिकेतून गायब झाली मग काही दिवसांनी तिच्या प्रेग्नसी आणि नंतर बाळंतपणाची बातमी चाहत्यांना मिळाली. याकाळात दयाबेनला पाहण्यासाठी चाहते मात्र फारच आतूर झाले होते. मात्र अनेक महिन्यांपासून दयाबेनच्या कमबॅकवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं. मात्र आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कारण दयाबेन तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये परत आली आहे. दिशा वकानीने तिच्या इंन्स्टा अकाउंटवरून ही खुशखबर स्वतः दिली आहे. 

View this post on Instagram

Grand Entry!!!

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

दयाबेनची ग्रॅंड एन्ट्री

दिशाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून एक छोटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जेठालाल अतिशय निराश आणि हताश होऊन बसलेला दिसत आहे. शिवाय त्याने मनाशी पक्कं ठरवलं आहे की तो जोपर्यंत दयाबेन येत नाही तोपर्यंत गरबा खेळणार नाही. त्यामुळे सोसायटीमधील इतर महिला या समस्येवर उपाय शोधत आहेत. अशातच जेठालालचा मेव्हणा सुंदर जेठालालला फोन करून सांगतो की, तो संध्याकाळपर्यंत दयाबेनला घेऊन घरी येत आहे. सहाजिकच हे ऐकून जेठालालचा आनंद गगनात मावत नाही. शिवाय या पोस्टसोबत दिशावकानीने  'ग्रॅंड एन्ट्री' असं शेअर केलं आहे. ज्यामुळे मालिकेत दयाबेन परत येतेय यावर शिक्का मोर्तब झालं आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिशावकानीचा मालिकेतील एक सीन दाखवण्यात आला आहे. ज्यावरून या मालिकेत दयाबेनचं शूटिंग सुरू झाल्याची कल्पना येत आहे. कारण यात दिशा वकानीचं वजन वाढलेलं दिसत आहे. शिवाय ती नेहमीपेक्षा थोडी वेगळीदेखील दिसत आहे.  

दिशा वकानीने घातल्या आहेत या अटी

दिशा वकानीने बाळंतपणासाठी या मालिकेतून सप्टेंबर 2017 पासून रजा घेतली होती. मात्र बाळ होऊन आता अनेक महिने झाले तरी दिशा वकानी मालिकेत परत आली नव्हती. त्यामुळे तीच्या  कमबॅकबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे दयाबेनला रिप्लेस करण्यात येणार आहे अशीही चर्चा होती. वास्तविक काही दिवसांपूर्वीच दिशा वकानीने पुन्हा मालिकेत काम करण्यास तयारी दाखवली होती. मात्र तिने काम करण्यासाठी निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. दिशाने मालिकेतील तिच्या मानधनामध्ये वाढ करण्याची अट घातली. तिने मालिकेच्या एका एपिसोडसाठी एक लाख पन्नास हजार मानधनाची मागणी केली होती. शिवाय या मालिकेसाठी महिन्यातून फक्त पंधरा दिवस काम करणार अशी अट घातली आहे. सकाळी 11 ते  सायंकाळी 6 पर्यंतच ती शूटिंग करण्यासाठी तयार झाली आहे. तिच्या बाळाच्या संगोपनासाठी तिने या अटी निर्मात्यांना घातल्या आहेत. या सर्व मागण्या मान्य करूनदेखील दिशाने मालिकेत परत येण्यास वेळ लावला असं निर्मात्याचं म्हणणं आहे. म्हणूनच दिशाला त्यांना नोटीस पाठवावी लागली. कारण काही असलं तरी शेवटी दिशा मालिकेत काम करण्यास तयार झाल्याने मालिकेच्या टीममध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्रसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा वकानीचा हा मालिकेतील पूर्ण कमबॅक नाही. कारण तिने काही सीनसाठीच सध्या शूटिंग केलं आहे. पूर्णपणे मालिकेत काम करण्याबाबत तिची निर्मात्यांसोबत चर्चा सुरू आहे. तिच्या अटी मान्य झाल्या तरच ती या मालिकेत येण्याची शक्यता आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

जॅक स्पॅरोसोबत तुलना केल्यामुळे सैफ अली खान झाला चाहत्यांवर नाराज

सलमान खान लवकरच राहायला जाणार त्याच्या नव्या घरी

हिरकणी’च्या कथेने भारावून गेलो…