‘या’ कारणामुळे दिव्यांका आणि विवेकला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेशन

‘या’ कारणामुळे दिव्यांका आणि विवेकला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेशन

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हिंदी मालिकेतील एक सेलिब्रेटी कपल आहे. 8 जुलै 2016 ला हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. भोपाळमध्ये अगदी धुमधडाक्यात आणि  पारंपरिक पद्धतीने या दोघांचं लग्न झालं होतं. आज या दोघांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. मात्र दिव्यांका आणि विवेकला यंदा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला आहे. ज्यामुळे त्यांच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलं आहे. 

विवेकला नेमकं काय झालं आहे

दिव्यांका आणि विवेक काही दिवसांपूर्वी मकाऊ वेकेशनवर गेले होते. त्यांनी मकाऊवरून त्यांचे सुट्टी एन्जॉय करताना काही फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले होते. मात्र मकाऊवरून आल्यावर विवेकची तब्येत अचानक बिघडली. विवेकला प्रचंड ताप आला ज्यामुळे त्याला त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. विवेकच्या पोटातील आतड्यांमध्ये इनफेक्शन झालं आहे. ज्यामुळे त्याला ताप येऊन तो आजारी पडला. विवेकला डॉक्टरांनी काही दिवस संपूर्ण बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. 

विवेक आणि दिव्यांकाला घरच्यांनी दिलं असं सरप्राईझ

विवेकच्या या आजारपणामुळे दिव्यांका आणि विवेकला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच साजरा करावा लागला आहे. मात्र दोघांच्यांही घरच्यांनी त्यांना अचानक हॉस्पिटलमध्ये भेट देऊन चकीत केलं. त्यांच्या कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये त्यांचा अॅनिर्व्हसरी केक आणला. मग या कपलने केक कापून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करताना दिव्यांकाने सोशल मीडियावर तिच्या भावना शेअर केल्या, “ या वर्षी आमच्या लग्नाचा वाढदिवस फारच वेगळा होता. कारण या निमित्ताने आमचे दोन्हीकडचे कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये केक घेऊन आले आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही असा एकत्रपणे साजरा केला. हे सरप्राईझ आमच्यासाठी नक्कीच खास होतं. आम्ही दोघांनी मात्र एकमेकांना केक भरवण्याऐवजी असं हायफाय करून आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.”

Instagram

विवेक आणि दिव्यांका झळकणार नच बलियेमध्ये

लवकरच तुमच्या आवडीचं  हे सेलिब्रेटी कपल टेलिव्हिजनमधून तुमच्या भेटीला येणार आहे. कारण 'नच बलिये'च्या नवीन सिझनध्ये हे दोघं होस्ट असणार आहेत. मात्र आता विवेकची तब्येत अचानक बिघडल्यामुळे नच बलियेच्या प्री लॉन्च एपिसोडमध्ये हे दोघं सहभागी होऊ शकणार नाहीत. या आधी दिव्यांकाने 'दी व्हॉईस 3' या शोचं अॅंकरिंग केलं होतं. शिवाय विवेक आणि दिव्यांका 'ये है मोंहब्बते' या मालिकेतून एकत्र दिसले होते. या मालिकेत दिव्यांका इशिता भल्लाची भूमिका साकारत आहे तर विवेकने या मालिकेत एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. दिव्यांका त्रिपाठी कोल्ड लस्सी और चिकन मसाला या  वेबसिरिजमध्ये देखील झळकली होती. शिवाय विवेक दहिया 'नागिन 4' मध्ये दिसणार आहे त्यांच्यासोबत या मालिकेत हिना खानदेखील असण्याची शक्यता आहे. विवेक आणि दिव्यांका सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. त्यांचे सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्गदेखील आहे. त्यामुळे विवेकला लवकर बरं वाटावं आणि त्याला नच बलियेमध्ये दिव्यांकासोबत पाहता यावं यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. 

अधिक वाचा

'ये है मोहबतें' फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत

5 वर्ष रिलेशनशिप नंतर स्वरा भास्करचं झालं ब्रेकअप!

या अभिनेत्रीने जसप्रीत बुमराहला केलं क्लीन बोल्ड,काय म्हणाला बुमराह

बॉलीवूड सेलेब्सनंतर आता कंगनाचा मीडियाशी 'पंगा'

पावसाळ्यात जेव्हा कलाकारांनाही आवरता येत नाही भजीचा मोह

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम