डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा HOT Makeover

डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा HOT Makeover

सध्या डिजीटल मीडियाचा प्रभाव वाढतोय. बरेचसे टीव्ही आणि अगदी चित्रपटातील कलाकारही डिजीटल क्षेत्रातील वेबसिरीजमध्ये काम करायला उत्सुक आहेत. त्यामुळे आता टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकारही वेबसिरीजमध्ये दिसत आहे. लवकरच टीव्हीवरील सर्वांची आवडती ‘इशी माँ’ अर्थात दिव्यांका त्रिपाठी दाहिया (Divyanka Tripathi Dahiya) देखील डिजीटल माध्यमात पदार्पण करत आहे. राजीव खंडेलवारबरोबर लवकरच ती एका वेबसिरीजमधून दिसणार आहे. पण या वेबसिरीजमध्ये काम करताना दिव्यांकाने आपला पूर्ण मेकओव्हर केला असून एका वेगळ्या आणि हॉट (Hot) अवतारात दिव्यांका तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. 

‘रब’ने नाही तर एकताने बनवली जोडी, आता करत आहेत सुखाचा संसार

दिव्यांका पहिल्यांदाच दिसणार हॉट लुकमध्ये

instagram

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘ये है मोहब्बतें’ मध्ये इशिता रमण भल्ला म्हणून प्रेक्षकांच्या मनात राज्य केलेल्या दिव्यांका त्रिपाठी दाहियाने आता आपल्या करिअरमध्ये नवी सुरुवात केली आहे. ही मालिका लवकरच संपणार असं सांगण्यात येत होतं. पण आता दिव्यांका एका वेगळ्या आणि हॉट लुकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. एकता कपूरच्या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीमधून दिव्यांका डिजीटल दुनियेत प्रवेश करत आहे. वेबसिरीज ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ (Coldd Lassi Aur Chicken Masala) मध्ये हॉट आणि अँग्री शेफ (chef) नित्याच्या भूमिकेत दिव्यांका दिसणार असून तिच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल दिसणार आहे. या वेबसिरीजची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या भूमिकेसाठी दिव्यांकाने आपला पूर्ण लुक बदलला असून ती एका वेगळ्याच ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. 

‘या’ कारणामुळे दिव्यांका आणि विवेकला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेशन

शेफ नित्यासाठी केला मेकओव्हर

Instagram

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया नेहमीच आपल्या कामाप्रती झोकून देताना दिसते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांचं हेच प्रेम कायम टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांका नेहमी मेहनत करते. तसंच त्यांनी नेहमी तिला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहावं असं तिला वाटतं. त्यामुळे तिने वेबसिरीज ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ मधून मेहनती शेफची व्यक्तिरेखा रंगवत पदार्पण केलं आहे. सिंगल मदर असणारी शेफ नित्या अतिशय हॉट आणि चार्मिंग आहे. या भूमिकेसाठी दिव्यांकाने आपलं वजनही कमी केलं आहे. इतकंच नाही लुक बदलण्यासाठी तिने आपले केसही कापले. 

राजीवबरोबर केले इंटिमेट सिन्स

या वेबसिरीजमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा सहकलाकार राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) यांनी इंटिमेट सीन दिल्याचीही चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये दोघांमध्ये स्पाईसी रोमान्स दिसणार आहे. याबाबत राजीवने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आणि दिव्यांकाच्या केमिस्ट्रीबद्दल सांगितलं होतं. प्रदीप सरकारच्या वर्कशॉपमुळे राजीव आणि दिव्यांका एकमेकांचे चांगले मित्र बनल्याचं त्यानं सांगितलं. इंटिमेट शूट करण्यासाठी एकमेकांशी ट्यूनिंग चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी या दोघांनी एकमेकांना समजून घेतल्याचंही त्याने सांगितलं. यासंदर्भात दिव्यांकाचा पती विवेक दहियालादेखील विचारण्यात आलं होतं. विवेकने हे तिचं काम असल्याने तिला पाठिंबा असल्याचंच सांगितलं. विवेक आणि दिव्यांकाची जोडी खूपच प्रसिद्ध असून या जोडीचेही अनेक चाहते आहेत. वास्तविक चाहत्यांमुळेच त्यांची जोडी जमली आणि त्यांचं लग्न झालं असंही त्यांनी याआधी खूप वेळा सांगितलं आहे.

Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल