दिव्यांका त्रिपाठीचा हटके फेसमास्क, शेअर केला व्हिडिओ

दिव्यांका त्रिपाठीचा हटके फेसमास्क, शेअर केला व्हिडिओ

लॉकडाऊनमुळे सर्व सेलिब्रेटीज सध्या घरातच आहेत. अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून निरनिराळे व्हिडिओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कुणी घरगुती वस्तूंपासून मास्क कसा करायचा हे शेअर करत आहे तर कुणी मनोरंजन करण्यासाठी टिकटॉक व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र 'ये हे मोहब्बते' फेम दिव्यांका त्रिपाठीने चक्क एक हटके आणि युनिक फेसमास्क चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Instagram

दिव्यांकाचा हटके फेसमास्क

दिव्यांका त्रिपाठीला सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत म्हणजे विवेक दहियासोबत घरात असल्याचं दिसत आहे. मात्र तिने चेहऱ्यावर कोरोनापासून बचाव करणारा मास्क लावलेला नसून एक ब्युटी मास्क लावला आहे. तिने चेहऱ्यावर चारकोलचा फेसमास्क लावला आहे. सगळीकडे कोरोनापासून बचाव करण्यासाठी फेस मास्क लावण्याचा सल्ला दिला जात असताना दिव्यांकाने मात्र हा अनोखा मास्क चेहऱ्यावर लावला आहे. आणि या व्हिडिओसोबत तिने मजेत शेअर केलं आहे की, "हाच माझा कोरोना मास्क आहे"

चारकोल मास्क असा तयार करा -

या मास्कपासून कोरोनापासून संरक्षण नक्कीच होणार नाही. मात्र घरी राहून तुमचं सौंदर्य नक्कीच खुलून येईल. दिव्यांकाने शेअर केलेला फेसमास्क तुम्हाला घरी तयार करायचा असेल तर तो असा तयार करा.

साहित्य -

एक चमचा अॅक्टिव्हेटेड चारकोल, एक चमचा गुलाबाचं पाणी, एक अथवा दोन बर्फाचे तुकडे

असा करा वापर  -

एका भांड्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा. मिश्रण एकत्र करून त्यापासून फेसमास्क तयार करा. हे  मिश्रण रात्रभर बर्फाच्या ट्रेमध्ये भरून ठेवा.  दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरून या चारकोल आईसक्युब्सने मसाज करा. किंवा तुम्ही दिव्यांकाने लावल्याप्रमाणे चेहऱ्यावर थेट हा थंड चारकोल फेसमास्क लावू शकता. फेसमास्क सुकल्यावर वीस मिनीटांनी चेहऱ्या थंड पाण्याने धुवा ज्यामुळे चेहऱ्यावर चमक दिसू लागेल. 

दिव्यांका आणि विवेक झालेत एकमेकांसाठी शेफ

लॉकडाऊनमध्ये दिव्यांका आणि विवेक एकमेकांसाठी खास वेळ काढत आहेत. घरातच राहून एकमेकांसाठी काहीतरी खास स्वयंपाक करण्याचा त्यांचा प्लॅन असतो. ज्यामुळे त्यांचं कुकिंग स्कीलदेखील जगासमोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच दिव्यांकाने विवेकसाठी मिठाई, पनीर टिक्का आणि काश्मिरी पुलाव तयार केला होता. विवेक आणि दिव्यांका पहिल्यांदा ये है मोहब्बतेच्या सेटवर भेटले आणि तिथेच त्यांच्या मनात एकमेंकांबद्दल प्रेमाच्या भावनाा निर्माण झाल्या. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं. 

ये मोहब्बतेने दिली खरी ओळख

दिव्यांकाने ये हे मोहब्बते मालिकेत इशिता भल्ला म्हणजेच इशिमाची भूमिका साकारली होती. ही मालिका आता संपली असली तरी तिची लोकप्रियता मात्र आजही कायम आहे. शिवाय दिव्यांकाला या मालिकेमुळे घरोघरी खरी ओळख मिळाली. आता दिव्यांका डिजिटल माध्यमामध्ये आपलं नशीब आजमावत आहे. काही दिवसांपूर्वीच ती कोल्ड लस्सी और चिकन मसाला या वेबसिरिजमधून प्रेक्षकांसमोर आली होती. ज्यामध्ये तिने  एका शेफची भूमिका साकारली होती. दिव्यांका तिचे आणि विवेकच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

Instagram