आता हा ट्रेलर नक्कीच लावेल तु्मच्या 'डोक्याला शॉट'

आता हा ट्रेलर नक्कीच लावेल तु्मच्या 'डोक्याला शॉट'

‘डोक्याला शॉट’ असे चित्रपटाचे नाव कसे अस शकते असा प्रश्न आम्हालाही पडला होता. पण आता डोक्याला शॉट का लागला? याचा फायनली उलगडा झाला आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये सुव्रतची भन्नाट कॉमेडी तर पाहायला मिळत आहेत. शिवाय त्याने भन्नाट मित्रही धम्माल करताना दिसत आहे. त्यामुळे हा ट्रेलर एकदा तरी पाहायलाच हवा. कारण मित्र,प्रेम आणि धमाल कॉमेडी असं सगळ कॉम्बिनेशन या चित्रपटात आहे.


तुमची लाडकी जयडी पुन्हा येतेय


 काय आहे ट्रेलरमध्ये ?


चित्रपटाचा टीझर आल्यानंतर चित्रपटाची कथा मराठी मुलगा आणि साऊथ इंडियन मुलगी यांची लव्हस्टोरी आहे असे वाटले होते. पण आता ट्रेलर आल्यानंतर या कथेचा संपूर्ण अंदाज चुकला असेच वाटत आहे. कारण यात खरचं अभिजीत म्हणजेत सुव्रतच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि त्यानंतर सगळ्यांच्या डोक्याला कसा शॉट लागतो ते पाहायला मिळते. कारण मोठ्या प्रयत्नाने अभिजीत सुब्बुलक्ष्मी(प्राजक्ता माळी) च्या वडिलांना लग्नासाठी तयार करतो. ते होकार देतात. काहीच दिवसात त्यांचे लग्न होणार असते. उद्या लग्न आणि नेमका आदल्यादिवशीच अभिजीत क्रिकेट खेळताना डोक्यावर पडतो आणि त्यानंतर तो सगळच विसरतो. सुब्बुलक्ष्मी कोण ? याचाही विसर त्याला पडतो. मग काय त्याला सगळ्या विसरलेल्या गोष्टी आठवाव्यात यासाठी त्याच्या तीन मित्रांची उडणारी तारांबळ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळ आहे. त्याहीपेक्षा यासगळ्यातून होणारी कॉमेडी मजेशीर आहे.चित्रपटातील मित्रांची यारी दोस्ती आणि मित्रासाठी काहीही करण्याची तयारी पाहिली की,तुम्हालाही तुमच्या मित्रांची नक्कीच आठवण येईल. या आधीही सुव्रतला 'शिकारी' या चित्रपटात पाहिले आहे.  तो चित्रपट वेगळ्या धाटणीचा असला तरी त्याच्या अभिनयाची चुणूक त्याने त्यातून दाखवली होती. विशेषत: त्याच्या विनोदाची शैलीही फार वेगळी आहे. 


रोहित शेट्टीच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन

Subscribe to POPxoTV

सुव्रतचा नैसर्गिक अभिनय


सुव्रतचा अभिनय या आधीही सगळ्यांनी पाहिला आहे. पण या चित्रपटात तो जास्त खुलून आला आहे. कॉमेडी करणे किती कठिण असते हे आपण सगळेच जाणतो. पण सुव्रतच्या कॉमेडीमध्ये सहजता पाहायला मिळते. त्याचे जितके संवाद ट्रेलरमध्ये आहेत ते भन्नाट आहेत. त्यामुळे हा ट्रेलर तुम्हाला हसायलाच लावतो. शिवाय तरुणाईला आवडेल असे संवाद सुव्रतचा ओठी आहेत म्हटल्यावर तुम्ही हा ट्रेलर पाहायलाच हवा. शिवाय सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी अशी फ्रेश जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण विषय मांडले जात आहेत. 


मराठीत पहिल्यांदा शूट करण्यात आले हिरोईन इंट्रोडक्शन साँग


 सुब्बुलक्ष्मी दिसलीच नाही


प्राजक्ताच्या फॅन्सशी मात्र काही अंशी निराशाच होणार आहे.कारण टीझरप्रमाणे ट्रेलरमध्येही प्राजक्ता केवळ दिसत आहे. पण तिचे कोणतेच संवाद नसल्यामुळे ती सुब्बुलक्ष्मी कशी आहे याचा अंदाज येत नाही. एक नक्की की प्राजक्ताच्या फॅन्सशी या ट्रेलरमुळे निराशा होणार आहे. सुब्बुलक्ष्मीचे बाबा दिसले आता तिचे कुटुंब आणि ती कधी भेटीला येणार याची उत्सुकता आहे. तर तुमच्या ‘डोक्याला शॉट’ लावण्यासाठी हा चित्रपट १ मार्चला रिलीज होणार आहे.


(सौजन्य-Youtube & Instagram)