ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘डोंबिवली रिटर्न’चा वेगवान आणि लक्षवेधी टीझर लाँच

‘डोंबिवली रिटर्न’चा वेगवान आणि लक्षवेधी टीझर लाँच

लोकलचे खडखडणारे रूळ… मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी… त्याबरोबरीनं येणारे प्रश्न… आणि मनातला कोलाहल… “डोंबिवली रिटर्न” जे जातं…तेच परत येतं? या चित्रपटाच्या टीजरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. स्वाभाविकच या चित्रपटाची उत्सुकता आता  आणखीनच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या टीझरची खूपच आतुरता प्रेक्षकांमध्ये होती. आता हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा चित्रपट फिरतो. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं काय घडतं की त्याचं आयुष्य बदलून जातं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाचा वेगवान टीझर पाहताना मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा हा चित्रपट असल्याचं स्पष्ट जाणवतं.

वाचा – संदीप कुलकर्णी दिसणार नव्या भूमिकेत

आशयसंपन्न चित्रपट बनवण्याची इच्छा

‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ अशा अनेक चित्रपटांमुळे संदीपची अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं. मात्र, ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कलाकृती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार असल्याचं संदीपनं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

sandeep FI

वाचा – “डोंबिवली रिटर्न”मध्ये संदीप कुलकर्णी-राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र

22 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी  चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत. उदयसिंग मोहिते यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून योगेश गोगटे यांचे संकलन आहे.राष्ट्रीय पारितोषिक विजेता शैलेंद्र बर्वे यांचे संगीत व पार्श्वसंगीत लाभले असून ध्वनी रेखांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अनमोल भावे यांचे आहे. आता ‘डोंबिवली फास्ट’ प्रमाणेच ‘डोंबिवली रिटर्न’लादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का हे लवकरच कळेल.

ADVERTISEMENT

dombivli return poster

वाचा – संदीप कुलकर्णी साकारणार कृतांतमध्ये ‘रहस्यमय’ भूमिका

पहिल्यांदाच संदीप आणि राजेश्वरी दिसणार एकत्र

या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र आले असून सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. पहिल्यांदाच आलेली ही जोडी आणि त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पुढच्या महिन्यात अनुभवता येणार आहे. शिवाय ‘Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मूळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे ह्याचं चित्रं उभं करणारा हा चित्रपट आहे. संदीप आणि त्याचे मित्र महेंद्र अटोले यांनी ‘कंरबोला क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. दोघांची आवड सारखीच असल्यानं दोघांनी एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली असल्याचंही संदीपनं यावेळी स्पष्ट केलं. आता ‘डोंबिवली फास्ट’ प्रमाणेच ‘डोंबिवली रिटर्न’लादेखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हे लवकरच कळेल.

ADVERTISEMENT

 

15 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT