डॉन 3 च्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात

डॉन 3 च्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात

अमिताभ बच्चनचा चित्रपट डॉन हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील एक अप्रतिम चित्रपट म्हणून ओळखला जातो. याची सिरीज नंतर शाहरूख खान आणि प्रियांका चोप्राच्या डॉन 2 ने सुरु झाली. फरहान अख्तरद्वारे दिग्दर्शित आणि फरहान आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केलेला डॉन 2 हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. यानंतर या चित्रपटाचा सिक्वल यावा अशी प्रेक्षकांची मनापासून इच्छा आहे आणि प्रेक्षक त्यासाठी वाटही पाहत आहेत. तर दुसरीकडे आता शाहरूख खानने राकेश शर्माचा बायोपिक सारे जहाँ से अच्छा या चित्रपटातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता शाहरूख खान डॉन 3 साठी वेळ देऊ शकेल असा अंदाज लावला जात आहे. शिवाय हा चित्रपट डॉनच्या चित्रीकरणासाठी पूर्ण वेळ देता यावा यासाठी सोडल्याचा अंदाजही सध्या लावला जात असून याची चर्चा रंगली आहे. पण या गोष्टींची अशीच चर्चा होत आहे असंही सांगण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी डॉन 3 च्या बाबतीत चांगले संकेत दिले आहेत.


don


डॉन 3 च्या स्क्रिप्टवर काम चालू


रितेश सिधवानीला याबद्दल विचारल्यानंतर या चित्रपटावर सध्या काम चालू असून नक्की कधी सुरु होणार याबाबत सांगण्यास नकार दिला. पण चाहत्यांसाठी ही नक्कीच खुशखबर आहे की, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर आणि इतर गोष्टींवर सध्या काम सुरु आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वल हवा आहे आणि त्यामुळे निर्माते प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नाहीत. त्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरु होईल अशी अशा चाहते बाळगू शकतात. 


शाहरूख प्रियांका येणार का एकत्र


याआधीच्या दोन्ही सिरीजमध्ये शाहरूख आणि प्रियांकाची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण त्यानंतरत शाहरूख आणि प्रियांका कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे या चित्रपटात पुन्हा एकदा ही जोडी दिसणार का हीदेखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


शाहरूख सध्या चित्रपटांपासून दूर


shahrukh


शाहरूखचे गेले दोन वर्ष एकापाठोपठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत. मागच्या वर्षी आलेला झिरोदेखील अगदी बॉक्स ऑफिसवर झिरो ठरला. त्यानंतर शाहरूख सध्या कोणत्याही चित्रपटात काम करत नाही. पण त्याच्या रेड चिलीज या प्रॉडक्शन अन्वये निर्मिती केलेला ‘बदला’ हा अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू अभिनीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. इतकंच नाही तर सध्या शाहरूख नेटफ्लिक्ससाठी वेबसिरीजदेखील प्रॉड्युस अर्थात निर्मितीमध्ये व्यस्त आहे. नुकतंच शाहरूखने तीन नव्या वेबसिरीजची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाहरूखला आता मोठ्या पडद्यावर नक्की कधी पाहता येईल याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि त्यातही तो चित्रपट जर डॉन 3 असेल तर प्रेक्षकांना अजून आनंद होईल यात वाद नाही. पण आता या चित्रपटाचं चित्रीकरण कधी सुरु होणार आणि या चित्रपटामध्ये शाहरूखची हिरॉईन कोण असणार याचीही चर्चा सध्या रंगू लागली आहे. सध्या शाहरूखच्या चाहत्यांना वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


केसरीतील लुकमुळे जगले ‘सारागढी’ युद्धाचा काळ- परिणिती चोप्रा


कॅन्सरशी यशस्वी लढा दिल्यावर पहिल्यांदा फंक्शनमध्ये दिसली सोनाली बेंद्रे


अभिनेता दिलीप कुमार यांची नात 'साएशा सेहगल' अडकली विवाहबंधनात